मेस्सीसह PSG च्या तीन फुटबॉलपटूंना कोरोना

Lionel Messi
Lionel Messi Sakal
Updated on

विक्रमी सात वेळा बॅलोन डीओर Ballon d'Or पुरस्कार विजेत्या लिओनेल मेस्सीला (Lionel Messi) कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यासह Paris Saint-Germain च्या संघातील तीन खेळाडूंचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.) कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यासह Paris Saint-Germain च्या संघातील तीन खेळाडूंचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जगभरात पुन्हा एकदा कोरोनाची भीती निर्माण झाली असताना क्रीडा क्षेत्रातही कोरोनाची धास्ती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

फ्रेंच कप फुटबॉल स्पर्धेपूर्वी पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) संघाला मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी पीएसजीने एका स्टाफ सदस्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. यावेळी त्यांनी नाव उघड केले नव्हते. पीएसजी टीमकडून शनिवारी रात्री दिलेल्या निवेदनानुसार, एका स्टाफ सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर टीमने एक यादी जाहीर केली. यात मेस्सीसह, युआन बेर्नाट, सर्जियो रिको आणि 19 वर्षीय मिडफील्डर नाथन बिटुमाजाला यांच्या नावांचा समावेश आहे.

Lionel Messi
गोलंदाजांची कामगिरी चोख, फलंदाजीत सुधारणा हवी : द्रविड
Lionel Messi
हार्दिक पांड्यासाठी धोक्याची घंटा; नव्या हिरोचा 'सुपर प्लॅन'

पीएसजी तिसऱ्या राउंडमध्ये वेनेसशी भिडणार आहे. मागच्या वर्षीचा उपविजेता मोनाको रविवारी क्युविली रोवेनशी सामना खेळणार आहे. रविवारी 13 लढती नियोडजित असून यातील संघ अंतिम 16 मध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतील. मोनाको संघातील 7 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. पण त्यांच्यात कोणाचीही परिस्थिती चिंताजनक नसल्याचे संघाने स्पष्ट केले होते. हे सर्व खेळाडू क्वारंटाईनमध्ये आहेत. याआधी फ्रेंच फुटबॉलर कायलन एम्बाप्पे , पॉल पोग्बा आणि ज्लाटन इब्राहिमोविच या दिग्गज फुटबॉलपटूंनाही कोरोनाचा सामना करावा लागला होता. नेमारचीही कोरोना चाचणी झाली. मात्र त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.