Lionel Messi Crying : लिओनेल मेस्सी ढसाढसा रडला; संघाचा विजय नव्हे, तर 'त्या' गोष्टीमुळे अश्रूंचा फुटला बांध

Lionel Messi Copa America 2024 : कोपा अमेरिका कपच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाने कोलंबियाविरुद्ध अत्यंत चुरशीच्या सामन्यात विजय मिळवला.
Lionel Messi Crying
Lionel Messi Cryingsakal
Updated on

Lionel Messi Copa America 2024 : कोपा अमेरिका कपच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाने कोलंबियाविरुद्ध अत्यंत चुरशीच्या सामन्यात विजय मिळवला. सामन्याच्या पूर्ण वेळेपर्यंत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत गेला जेथे अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लॉटारो मार्टिनेझने गोल केला. अर्जेंटिनाने १६व्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. सामन्यादरम्यान लिओन मेस्सी ढसाढसा रडला.

Lionel Messi Crying
Lionel Messi Crying : लिओनेल मेस्सी ढसाढसा रडला; संघाचा विजय नव्हे, तर 'त्या' गोष्टीमुळे अश्रूंचा फुटला बांध

लिओन मेस्सी का रडला?

खरं तर, कोलंबियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कोपा अमेरिका फायनलच्या दुसऱ्या हाफमध्ये स्टार लिओन मेस्सीला दुखापत झाली. गंभीर दुखापतीमुळे त्याला सामन्याच्या 66व्या मिनिटाला मैदान सोडावे लागले.

मेस्सी मैदानातून डगआऊटकडे जात असताना त्याने रागाच्या भरात त्याच्या बुटही फेकला. यानंतर तो लहान मुलासारखा रडताना दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पाहणारे चाहते मेस्सीच्या वेदना समजू शकतात.

Lionel Messi Crying
Argentina Champion Copa America 2024 : चॅम्पियन अर्जेंटिना! सोळाव्यांदा 'कोपा अमेरिका'च्या ट्रॉफीवर कोरले नाव; कोलंबियाला पाजले पाणी

मेस्सीच्या कारकिर्दीचा शेवट?

मेस्सीची दुखापत किती गंभीर आहे याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आली नाही. पण, यामुळे कोपा अमेरिका 2024 ची अंतिम फेरी मेस्सीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट आहे का?, असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. कारण तो आता 37 वर्षीचा आहे आणि दुखापत गंभीर झाल्यास त्याला त्याचा प्रवास पुढे नेणे फारसे सोपे होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.