Lionel Messi : लिओनेल मेस्सी इंटर मियामीचा नवा कर्णधार! लीग कप सामन्याआधी मोठी घोषणा

lionel messi named inter miamis new captain
lionel messi named inter miamis new captain
Updated on

Lionel Messi : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने शुक्रवारी अमेरिकेच्या फुटबॉल क्लब इंटर मियामीसाठी पदार्पणाच्या सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी केली. सामना संपण्याच्या काही सेकंद आधी, मेस्सीने नेत्रदीपक फ्री किकवर गोल करून इंटर मियामीला लीग कप सामन्यात मेक्सिकन क्लब क्रुझ अझुल विरुद्ध 2-1 असा रोमांचक विजय मिळवून दिला होता.

lionel messi named inter miamis new captain
WI vs IND: पहिल्या वनडेसाठी भारताची Playing-11 निश्चित, कर्णधार रोहित 'या' खेळाडूंना देणार डच्चू?

या दरम्यान इंटर मियामीचे मुख्य प्रशिक्षक गेरार्डो "टाटा" मार्टिनो यांच्या मते, मेस्सीलिओनेल मेस्सी इंटर मियामीचा नवा कर्णधार होईल. मेस्सी किती काळ मैदानावर असेल, हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असल्याचे मार्टिनोने सांगितले.

अटलांटा युनायटेड विरुद्ध इंटर मियामीचे नेतृत्व मेस्सी करणार का असे विचारले असता, मार्टिनोने म्हणाले की, मेस्सी आणि सर्जिओ बुस्केट्स हे दोघेही सुरुवातीपासूनच खेळण्याची शक्यता आहे. पण त्यांना कसे वाटते यावर सर्व काही अवलंबून असेल. हा त्याचा दुसरा गेम आहे.

lionel messi named inter miamis new captain
WI vs IND: ODI मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या संघाची घोषणा! दोन दिग्गज खेळाडूचा पत्ता कट, यांना मिळाली संधी

मेस्सीने अविस्मरणीय कामगिरी करून आपल्या नवीन क्लबसोबत पदार्पण सामना संस्मरणीय बनवला. 90 मिनिटांपर्यंत स्कोअर 1-1 असा बरोबरीत होता. सामना संपण्याच्या काही सेकंद आधी, फाऊलमुळे इंटर मियामीला फ्री किक मिळाली. मेस्सीने बॉक्सच्या बाहेरून डाव्या पायाने अप्रतिम शॉट मारला, जो थेट पोस्टवर गेला. त्यामुळे इंटर मियामीने लिजेंड्स कप सामन्यात मेक्सिकन क्लब क्रुझ अझुलवर 2-1 असा विजय मिळवला.

मेस्सीच्या या गोलनंतर संपूर्ण स्टेडियममध्ये जल्लोष झाला. त्याचवेळी हा गोल पाहून संघाचा सहमालक आणि माजी दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम भावूक झाला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.