Lionel Messi Argentina : अखेर मेस्सीच्या हाताचा ठसा 'वर्ल्डकप'वर उमटला; अर्जेंटिना 36 वर्षाने झाला विश्वविजेता!

Argentina Won Fifa World Cup 2022 After 36 Year
Argentina Won Fifa World Cup 2022 After 36 Year esakal
Updated on

Argentina Won Fifa World Cup 2022 After 36 Year : शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने पेनाल्टी शूटआऊटवर 4 - 2 असा विजय मिळवत तब्बल 36 वर्षांनी वर्ल्डकपवर आपले नाव कोरले. अर्जेंटिनाने पहिल्या हाफमध्येच दोन गोल करत आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर एम्बाप्पेने एका मिनिटात दोन गोल करत सामना बरोबरीत आणला. एक्स्ट्रा टाईममध्ये देखील मेस्सीने अर्जेंटिनाला 108 व्या मिनिटाला आघाडी घेतली. मात्र अर्जेंटिनाची एक चूक महागात पडली अन् 118 व्या मिनिटाला एम्बाप्पेने पेनाल्टीवर हॅट्ट्रिकवाला गोल करत सामना पेनाल्टी शूटआऊटवर नेला. मात्र पेनाल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने सरस खेळ करत 4 - 2 असा विजय मिळवला.

अर्जेंटिनाचे दिवंगत स्टार फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांनी अर्जेंटिनाला 1986 मध्ये वर्ल्डकप जिंकून दिला होता. त्यानंतर जवळपास 36 वर्षे अर्जेंटिनाला वर्ल्डकपने हुलकावणी दिली होती. मात्र अखेर 36 वर्षांनी हा सुवर्णयोग आलाच आणि लिओनेल मेस्सीचे एक वर्तुळ देखील पूर्ण झाले. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या नावपुढे विश्वविजेत्याचा टॅग लागला.

या वर्ल्डकप विजयात लिओनेल मेस्सीचा मोठा वाटा आहे. त्याने स्पर्धेत 7 गोल करत वर्ल्डकप विजयाचे स्वप्न साकार केले. विशेष म्हणजे 1986 च्या वर्ल्डकप विजयानंतर एका वर्षाने म्हणजे 1987 मध्ये जन्मलेल्या लिओनेल मेस्सीने अखेर 36 वर्षानंतर पुन्हा एकदा अर्जेंटिनाला विश्वविजेता बनवले.

अर्जेंटिनाने सामन्यात 79 व्या मिनिटापर्यंत 2 - 0 अशी आघाडी घेत सामना जवळपास खिशात टाकला होता. मात्र किलियन एम्बाप्पेने एका मिनिटाच्या अंतरावर दोन गोल करत सामना बरोबरीत आणला. सामना पूर्णवेळ 2 - 2 असा बरोबरीत राहिल्याने एक्स्ट्रा टाईममध्ये गेला. मात्र मेस्सीने पुन्हा आपली जादू दाखवत 108 व्या मिनिटाला अर्जेंटिनासाठी दुसरा गोल करत आघाडी घेतली. मात्र फ्रान्सने 118 व्या मिनिटाला एम्बाप्पेने पेनाल्टीवर तिसरा गोल करत सामना पुन्हा 3 - 3 असा बरोबरीत आणला. अखेर सामना पेनाल्टी शूटआऊटवर गेला.

अंगावर शहारे आणणारा पेनाल्टी शूटआऊट

  • एम्बाप्पेने पहिली पेनाल्टी गोल करत 1 - 0 अशी आघाडी घेतली.

  • मेस्सीने पहिली पेनाल्टी अचूक मारत 1 - 1 अशी बरोबरी साधली.

  • अर्जेंटिनाच्या मार्टिनेझने फ्रान्सची दुसरी पेनाल्टी सेव्ह केली.

  • त्यानंतर पॉल डयबालाने अर्जेंटिनासाठी गोल करत 2 - 1 अशी आघाडी घेतली.

  • फ्रान्सने तिसरी पेनाल्टी मिस केली. मात्र अर्जेंटिनाने तिसरी पेनाल्टी मार आघाडी 3 - 1 अशी केली.

  • त्यानंतर फ्रान्सच्या मुआनीने गोल केला. मात्र अर्जेंटिनाच्या गोंझालो माँटेअलने निर्णायक पेनाल्टी यशस्वीरित्या मारत अर्जेंटिनाला 4 - 2 असा विजय मिळवून दिला.

Argentina Won Fifa World Cup 2022 After 36 Year
Kylian Mbappe : अवघ्या 23 वर्षाच्या एम्बाप्पेने केले एका मिनिटात दोन गोल, मोडले मोठे रेकॉर्ड; सामनाही बरोबरीत

पहिल्या हाफमध्येच गतविजेते बॅकफूटवर

फिफा वर्ल्डकप 2022 च्या फायनल सामन्यात पहिल्या मिनिटापासूनच अर्जेंटिनाने आक्रमक खेळ करत फ्रान्सवर चढाया करण्यास सुरूवात केली. अशीच एक चढाई करताना फ्रान्सच्या डेम्बेलेने अर्जेंटिनाच्या डी मारियाला डीमध्ये अवैधरित्या अडवले. याचा फटका फ्रान्सला बसला आणि अर्जेंटिनाला पेनाल्टी मिळाली.

अर्जेंटिनाकडून मेस्सीने पेनाल्टी मारली. त्याने डाव्या पायाने गोलपोस्टच्या उजव्या कोपऱ्यात गोल करत अर्जेंटिनाचे खाते उघडले. याचबरोबर त्याने वर्ल्डकपमधील आपला सहावा गोल केला. ही त्याची एका वर्ल्डकपमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. तसेच तो आता गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडीवर देखील पोहचला आहे.

अर्जेंटिनाने सामन्याच्या 23 व्या मिनिटालाच गोल करत फ्रान्सला बॅकफूटला ढकलले. यातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच अर्जेंटिनाचा डी मारियाने 36 व्या मिनिटाला अॅलिस्टरच्या सहाय्याने गतविजेत्यांवर दुसरा गोल केला.

Argentina Won Fifa World Cup 2022 After 36 Year
Lionel Messi : मेस्सीने 23 व्या मिनिटाला इतिहास रचला; 'ही' कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

दुसऱ्या हाफमध्ये फ्रान्सचा डॅमेज कंट्रोल करण्याचा प्लॅन

पहिल्याच हाफमध्ये गतविजेत्या फ्रान्सला अर्जेंटिनाकडून दोन खावे लागले. पहिल्या हाफमध्ये फ्रान्स पूर्णपणे बॅकफूटवर दिला. 2 - 0 अशा पिछाडीवर पडलेल्या फ्रान्सने दुसऱ्या हाफमध्ये डॅमेज कंट्रोल करण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्यांनी अर्जेंटिनाच्या गोलपोस्टवर चढाया करण्यास सुरूवात केली. तसेच पासिंगवर भर देत बॉल आपल्या ताब्यात ठेवण्याची रणनिती अवलंबली.

मात्र अर्जेंटिनाने देखील प्रतिहल्ले चढवत फ्रान्सच्या गोलकिपरची चांगलीच परीक्षा पाहिली. दुसऱ्या हाफमध्येही पासिंग आणि बॉल पजेशनच्या बाबतीत अर्जेंटिनाने गतविजेत्या फ्रान्सपेक्षा सरस कामगिरी केली. तसेच गोलपोस्टवर चढाई करण्यात देखील मेस्सीच्या अर्जेंटिनाने आघाडी घेतली. मात्र सामन्याच्या 79 व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या ओटामेंडीने फ्रान्सच्या खेळाडूला डी मध्ये अवैधरित्या अडवले. त्यामुळे फ्रान्सला पेनाल्टी मिळाली आणि इथंच सामना फिरला. एम्बाप्पेने 80 व्या मिनिटाला पेनाल्टीवर गोल करत फ्रान्सचे खाते उघडले. त्यानंतर अवघ्या एका मिनिटाच्या आत एम्बाप्पेने दुसरा गोल करत 2 - 2 अशी बरोबरी साधली.

एक्स्ट्रा टाईमचा थरार

एस्क्ट्रा टाईंमच्या पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाने गोल करण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. दुसऱ्या हाफमध्ये 108 व्या मिनिटाला मेस्सीने गोल करत अर्जेंटिनाला पुन्हा विजयी मार्गावर आणले. अर्जेंटिना सामना जिंकणार असे वाटत असतानाच फ्रान्सला पेनाल्टी मिळाली. एम्बाप्पेने आपला तिसरा गोल करत सामना बरोबरीत आणत हॅट्ट्रिक साधली. अखेर सामना पेनाल्टी शूटआऊटवर गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.