Lionel Messi FIFA Player Of The Year Award 2022 : अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघाचा स्टार आणि अनुभवी फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला पॅरिसमध्ये 2022 सालचा फिफा प्लेयर ऑफ द इयरचा किताब देण्यात आला आहे. महिला गटात सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार स्पॅनिश खेळाडू अलेक्सिया पुटेलसला देण्यात आला.
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर लिओनेल मेस्सीने पहिला फिफा विश्वचषक जिंकला. ज्याचे आयोजन कतारमध्ये करण्यात आले होते. फ्रान्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मेस्सीनेदोन महत्त्वाचे गोल केले होते. अंतिम सामना जिंकून अर्जेंटिनाने तब्बल 36 वर्षांनंतर विश्वचषकाची सुवर्ण ट्रॉफी जिंकली.
लिओनेल मेस्सी व्यतिरिक्त अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून देणारे त्याचे प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांची फिफाच्या 2022 वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षकासाठी निवड करण्यात आली आहे. एवढेच नाही तर अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून देण्यात त्याचा कीपर एसी मार्टिनेझने महत्त्वाची भूमिका बजावली. ज्यासाठी त्याला FIFA गोलकीपर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
लिओनेल मेस्सीने दुसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे. यासह त्याने पोर्तुगालचा दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि पोलंडचा रॉबर्ट लेवांडोस्की यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे, ज्यांनी दोनदा कब्जा केला. पीएसजी क्लबकडून खेळणाऱ्या मेस्सीला यापूर्वी 2019 मध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. रोनाल्डोने 2016 आणि 2017 मध्ये सलग दोन वर्षे हा पुरस्कार जिंकला. तर लेवांडोव्स्कीने 2020 आणि 2021 मध्ये ते ताब्यात घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.