Lionel Messi : मेस्सीने जिंकली करोडो भारतीयांचीही मने; धोनीची कॉपी करत करून दिली 'त्या' घटनेची आठवण

Lionel Messi
Lionel Messi
Updated on

जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने अमेरिकेत धुमाकुळ घालत आहे. त्याने अमेरिकन क्लब इंटर मियामीला पहिल्यांदा लीग कपमध्ये चॅम्पियन बनवले. मेस्सीच्या नेतृत्वाखाली संघाने सलग सातवा सामना जिंकला. लीग कपच्या अंतिम फेरीत नॅशव्हिलचा पराभव केला. निर्धारित वेळेनंतर 1-1 असा बरोबरीत सुटल्यानंतर सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. तेथे इंटर मियामीने सामना 10-9 जिंकला.

Lionel Messi
ODI World Cup 2023: BCCIची वाढली डोकेदुखी! वर्ल्ड कपचे शेड्यूल पुन्हा बदलणार? मोठं कारण आलं समोर

मेस्सीने या सामन्यात केवळ चांगली कामगिरी केली नाही तर आपल्या खास शैलीने चाहत्यांची मनेही जिंकली. चॅम्पियन झाल्यानंतर तो ट्रॉफी उचलताना नाराज दिसत होता, येडलिन जो त्याच्या येण्याआधी इंटर मियामीचा कर्णधार होता, त्याला ट्रॉफी उचलण्यासाठी बोलावले. यानंतर दोघांनी मिळून ट्रॉफी उंचावली. यावेळी भारतीय चाहत्यांना महेंद्र सिंह धोनीची आठवण झाली.

आयपीएल 2023 मध्ये रवींद्र जडेजाने अखेरच्या चेंडूवर चौकार मारत चेन्नईला सनसनाटी विजय मिळून दिला. यासोबत महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई संघाने पाचव्यांदा आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावले. विजेतेपदाचा कप साधारणतः कर्णधार घेत असतो. पण त्या वेळी जय शहा आणि रॉजर बिन्नी धोनीला कप देत होते; परंतु धोनीने आयपीएलमधून निवृत्त होत असलेल्या अंबाती रायडू आणि मॅच विनर रवींद्र जडेजाला बोलवले आणि त्यांना कप दिला.

Lionel Messi
IRE vs IND Playing 11: दुसऱ्या टी-20मध्ये टीम इंडिया बदलणार, हा खेळाडू प्लेइंग-11 मधून बाहेर?

मेस्सीने इंटर मियामीसाठी सात सामन्यांमध्ये दहावा गोल केला. पूर्वार्धातच त्याने संघाला आघाडी मिळवून दिली. मेस्सीने 23व्या मिनिटाला बॉक्सच्या बाहेरून थेट गोल केला आणि अनेक नॅशव्हिल खेळाडूंना चकित केले. उत्तरार्धात नॅशव्हिल संघाने पुनरागमन करत 57व्या मिनिटाला फाफा पिकोल्टने केलेल्या गोलने सामना बरोबरीत आणला. निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघांना दुसरा गोल करता आला नाही.

Lionel Messi
UAE vs NZ 2nd T20: न्यूझीलंडला हरवून UAE ने रचला इतिहास! किवी संघाच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

पेनल्टी शूटआऊट बराच वेळ चालला. दोन्ही संघांना 11-11 शॉट्स घ्यावे लागले. नॅशव्हिलसाठी रँडल लीलचा दुसरा शॉट चुकला. त्याचवेळी इंटर मियामीसाठी व्हिक्टर उलुआचा पाचवा शॉट चुकला. मग 11वा शॉट गोलरक्षक ड्रेक कॅलेंडरने घेतला आणि त्याने चेंडू गोलपोस्टमध्ये पाठवला. गोलरक्षक इलियट पॅनिको नॅशव्हिलसाठी 11वा शॉट मारण्यासाठी आला, पण या वेळी ड्रेकने विरोधी संघाच्या गोलरक्षकाचा चेंडू रोखून इंटर मियामीला चॅम्पियन बनवले.

मेस्सीने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याने सात सामन्यांत 10 गोल केले. त्याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार आणि लीग कप टॉप स्कोअररचा पुरस्कारही मिळाला. तर, इंटर मियामीच्या ड्रेक कॅलेंडरला सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा पुरस्कार मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.