Argentina Cricket Team : अर्जेंटिनाच्या महिला क्रिकेट संघाने शनिवारी इतिहास रचला. अर्जेंटिनाच्या संघाने चिलीविरुद्धच्या टी-२० लढतीत २० षटकांमध्ये १ बाद ४२७ धावांचा पाऊस पाडला. महिलांच्या टी-२० क्रिकेटमधील एका डावात या सर्वाधिक धावा ठरल्या.
चिलीचा संघ धावांचा पाठलाग करताना ६३ धावांमध्ये गडगडला. अर्जेंटिनाने ३६४ धावांनी विजय संपादन केला. महिलांच्या टी-२० क्रिकेटमधील हा सर्वाधिक धावांनी मिळवलेला विजय ठरला.
अर्जेंटिनाकडून मिळालेल्या ४२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या चिलीच्या संघाला ६३ धावाच करता आल्या. दहा खेळाडूंना एकेरीच धाव करता आल्या.
जेसिका मिरांडा हिने २७ धावा केल्या. त्याआधी चिली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. लुशिया टेलर हिने ८४ चेंडूंमध्ये २७ चौकारांची आतषबाजी करीत १६९ धावांची देदीप्यमान खेळी केली.
ॲलबरटिना गलान हिने नाबाद १४५ धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीत तिने २३ चौकार मारले. टेलर व गलान या सलामी जोडीने ३५० धावांची विक्रमी भागीदारी रचली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.