Lionel Messi : स्टार खेळाडू लियोनेल मेस्सीचा डबल धमाका; लीग फुटबॉल करंडकाच्या अंतिम १६ फेरीमध्ये प्रवेश

लीग फुटबॉल करंडक : इंटर मियामी क्लबची आगेकूच ; ओरलँडो सिटीवर ३-१ असा विजय
lionel messi
lionel messisakal
Updated on

नवी दिल्ली : लियोनेल मेस्सीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर इंटर मियामी क्लबने गुरुवारी झालेल्या लढतीत ओरलँडो सिटीवर ३-१ असा विजय मिळवला. या विजयासह इंटर मियामी क्लबने लीग फुटबॉल करंडकाच्या अंतिम १६ फेरीमध्ये प्रवेश केला.

इंटर मियामी-ओरलँडो यांच्यामधील लढत ९५ मिनिटे उशिरा सुरू झाली. वादळामुळे या लढतीला विलंब झाला, पण मेस्सी याने सुरुवातीलाच ओरलँडो सिटीला धक्का दिला. त्याने रॉबर्ट टेलरकडून मिळालेल्या पासवर अफलातून गोल केला आणि इंटर मियामी संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

पण १७ व्या मिनिटाला उरुग्वेचा मधल्या फळीतील खेळाडू सेझार अरॉझो याने ओरलँडो सिटीसाठी गोल करीत त्यांना बरोबरी साधून दिली. पूर्वार्धात दोन्ही क्लबमध्ये १-१ अशी बरोबरी कायम राहिली.

उत्तरार्धात सुरुवातीलाच इंटर मियामी क्लबने २-१ अशी आघाडी मिळवली. जोसेफ मार्टीनेझ याने ५१ व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला आणि इंटर मियामी क्लब पुढे गेला. त्यानंतर रॉबर्ट टेलर व जोसेफ मार्टीनेझ यांच्या दमदार समन्वयामुळे इंटर मियामीचा तिसरा गोल झाला.

टेलर व मार्टीनेझ यांच्या कौशल्यामुळे मेस्सीने या लढतीतील दुसरा गोल केला. लढत संपायला काही मिनिटे बाकी असताना सेझारकडून ओरलँडो सिटीसाठी गोल करण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्याच्याकडून गोल करण्यातही आला, पण ऑफ साईड असल्यामुळे हा गोल ग्राह्य धरण्यात आला नाही.

सलग तिसऱ्या लढतीत गोल

लियोनेल मेस्सीने इंटर मियामी क्लबसाठी मोलाची कामगिरी केली आहे. ओरलँडो सिटी क्लबविरुद्ध दोन गोल करीत इंटर मियामी क्लबला धडाकेबाज विजय मिळवून देणाऱ्या मेस्सी याने याआधीच्या दोन लढतींतही गोल करण्याची किमया केली आहे. मेस्सी याआधी अटलांटा युनायटेड व क्रुझ अझुल या दोन क्लब्सविरुद्धही गोल केले आहेत.

इंटर मियामी क्लबसाठी खेळताना त्याने सलग तीन लढतींत गोल केले हे विशेष. दरम्यान, मेस्सी याने कतार येथे झालेल्या विश्‍वकरंडकात अर्जेंटिनासाठी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे त्यांना १९८६नंतर प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकता आली होती. स्वप्नपूर्ती झाल्यानंतरही त्याच्याकडून छान खेळ होत आहे.

आता लढत डल्लासशी

इंटर मियामी क्लबचा पुढील सामना ६ ऑगस्ट रोजी होणार आहे. इंटर मियामीसमोर एफसी डल्लास या क्लबचे आव्हान असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()