धोनीशी व्हायची तुलना; निवृत्तीनंतर विक्रमी धमाका

naman ojha
naman ojha Sakal
Updated on

टीम इंडियात (Team India) अनेक प्रतिभावंत विकेट किपर आले. त्यातील काहींनी महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) उत्तम पर्याय असल्याची झलक दाखवलीही. पण संघ व्यवस्थापनाकडून जेवढा हवा तेवढा सपोर्ट न मिळाल्याने त्यांची अवस्था आले कधी अन् गेले कधी हे देखील कळलं नाही. नमन ओझा (Naman Ojha) त्यातीलच एक. 2010 मध्ये त्याने टीम इंडियात पदार्पण केले. वनडेतील कामगिरीशिवाय त्याने कसोटीतही लक्षवेधी कामगिरी करुन दाखवली होती. पण त्याची कारकिर्द फार काही बहरली नाही.

लीजेंड्स क्रिकेट लीगमध्ये नमन ओझाने (Naman Ojha) वर्ल्ड जाएंट्स विरुद्धच्या सामन्यात धमाकेदार इनिंग खेळून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधलं. त्याने 69 चेंडूत 9 षटकार आणि 15 चौकाराच्या मदतीने 140 धावा कुटल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर मोहम्मद कैफच्या (Mohammad Kaif) नेतृत्वाखालील इंडियन्स महाराजा टीमने 209 धावा केल्या होत्या. पण प्रतिस्पर्ध्यांनी 210 धावा करत ओझाचे शतक व्यर्थ ठरवलं.

naman ojha
Australian Open: सानिया-राजीव राम जोडी पोहचली उपांत्यपूर्व फेरीत

नमन ओझाने मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. नमन ओझाने इंदुरच्या होळकर स्टेडियमववर अखेरचा सामना खेळला होता. क्रिकेटला अलविदा करताना तो चांगलाच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. संघातून ड्रॉप केल्यानंतर त्याला पुन्हा संधी मिळाली नव्हती.

देशांतर्गत क्रिकेटमधील यशस्वी विकेट किपर

नमन ओझाने देशांतर्गत क्रिकेटसह आयपीएलमध्ये (IPL) दमदार कामगिरी करुन दाखवली होती. नमन ओझाच्या नावे रणजी ट्रॉफीत खास रेकॉर्ड आहे. त्याने विकेटमागे 351 विकेट्स घेतल्या आहेत. 113 आयपीएलमध्ये 94 डावात 118.35 च्या स्ट्राइक रेटनं 1554 धावा केल्या आहेत. 94 ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.

naman ojha
शामसी पंतचा फोटो शेअर करत म्हणाला, कधीही मर्यादा ओलांडू नका!

2015 मध्ये खेळला अखेरचा सामना

नमन ओझा 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. झिम्बाब्वे विरुद्ध त्याने वनडे आणि टी-20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. आपल्या कारकिर्दीत त्याने एकमेव कसोटी सामना खेळला. वृद्धीमान साहाच्या अनुपस्थितीत त्याला संघात स्थान मिळाले होते. देशांतर्गत क्रिकेटमधील फटकेबाजीमुळे धोनीचा पर्याय म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जात होते. नमन ओझामध्ये धोनीप्रमाणेच मॅच फिनिशिंग इनिंग खेळण्याची क्षमता होती. पण त्याला अधिक संधी मिळाली नाही. 2015 मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. नमन ओझा रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्येही मैदानात उतरला होता. सध्याच्या घडीला तो लीजेंड क्रिकेट लीगमध्ये इंडियन्स महाराजाचा प्रमुख विकेटकिपर आणि सलामी फलंदाज म्हणून खेळताना दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.