Rahul Tripathi : 13 सामने बेंचवर बसल्यानंतर राहुलने अखेर इंडियाची कॅप घातली

Rahul Tripathi India Vs Sri Lanka 2nd T20
Rahul Tripathi India Vs Sri Lanka 2nd T20esakal
Updated on

Rahul Tripathi India Vs Sri Lanka 2nd T20 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात अखेर पुण्याचा लोकल बॉय राहुल त्रिपाठीला भारताकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. तब्बल 13 सामने भारतीय संघासोबत बेंचवर बसून काढलेल्या राहुल त्रिपाठीला आपली गुणवत्ता दाखवून देण्याची संधी मिळाली. राहुल एका बाबतीत खूप लकी ठरला. राहुल आपल्या होम ग्राऊंड पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर आपले टी 20 पदार्पण करणार आहे.

Rahul Tripathi India Vs Sri Lanka 2nd T20
IND vs SL 2nd T20I : श्रीलंकेचा 2016 नंतरचा भारतात पहिला विजय; अक्षर - मावीची झुंज व्यर्थ

पहिल्या सामन्यात भारताने फलंदाजीत फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. मधल्या फळीतील फलंदाज संजू सॅमसन स्वस्तात माघारी गेली होता. मात्र संजू सॅमसनला एका खराब खेळीमुळे बेंचवर बसवण्याची शक्यता नाही. तर संजू सॅमसनला सामन्यादरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती. त्याचा गुडघा सुजला होता. त्यामुळे त्याच्या गुडघ्याचे स्कॅन करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या टी 20 सामन्यात संजू सॅमसनच्या जागी राहुल त्रिपाठीला टी 20 पदार्पण करण्याची संधी देण्यात आली.

राहुल त्रिपाठीने पदार्पण केल्यापासून गेले 13 सामने बेंचवरच बसून होता. राहुल त्रिपाठीसाठी फलंदाजीचा चौथा क्रमांक अगदी योग्य आहे. मात्र तो सलामीला देखील खेळू शकतो.

Rahul Tripathi India Vs Sri Lanka 2nd T20
PAK vs NZ : नावात गोंधळ घालणाऱ्या पाकिस्तानी समालोचकाला पॉर्नस्टार VIDEO शेअर करत म्हणाली...

राहुल त्रिपाठी या मालिकेत होता संघासोबत

  • भारत विरूद्ध आयर्लंड टी 20 (2 सामने)

  • भारत विरूद्ध झिम्बाब्वे वनडे (3 सामने)

  • भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (3 सामने)

  • भारत विरूद्ध बांगलादेश (3 सामने)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.