Look Back 2023 Rohit Sharma : कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वा भारतीय क्रिकेट संघाने या वर्षी दोन आयसीसी ट्रॉफी खेळल्या. पहिली म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि दुसरी म्हणजे आयसीसी वनडे वर्ल्डकप! दोन्ही ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली. फायनलपर्यंत पोहचण्याच्या प्रक्रियेत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. मात्र शेवटच्या क्षणी त्यांना ट्रॉफी जिंकता आली नाही.
भारतीय संघाने संपूर्ण वर्षभरात चांगलं क्रिकेट खेळलं असलं तरी ज्या उद्येशासाठी टीम इंडिया इतकी झुंजली ते काही साध्य झालं नाही. त्यामुळे कर्णधार म्हणून रोहित शर्मासाठी हे 2023 वर्ष यशस्वी म्हणायचं की दुर्दैवी म्हणायचं याबाबत संभ्रम आहे.
वैयक्तिक रोहितबाबत बोलायचं झालं तर नुकतेच रोहितकडून मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी काढून घेण्यात आली. दोन आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी गमावली. त्यामुळे 2023 हे त्याच्यासाठी निराशा करणारं वर्ष ठरलं असं म्हणता येईल.
रोहित शर्माने भारतीय संघाचे नेतृत्व हाती घेतल्यानंतर जून महिन्यात भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळली. ही फायनल ऑस्ट्रेलियाविरूद्ध होती. सामना इंग्लंडमध्ये झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला. सलग दुसऱ्यांदा भारताने WTC ची फायनल गमावली.
यंदाचा वनडे वर्ल्डकप भारत भारतात खेळणार होता. त्यामुळे त्यांच्याकडून विजेतेपदापेक्षा कमी कोणतीच अपेक्षा नव्हती. मात्र WTC प्रमाणे वनडे वर्ल्डकपमध्ये देखील ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं. फायनलमध्ये भारत 6 विकेट्सनी पराभव केलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने फायनलपूर्वी वर्ल्डकपमधील सर्वचे सर्व 10 सामने जिंकले होते.
रोहित शर्मा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेल्या दु:खातून बाहेर पडला नव्हता. त्यात मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला धक्का दिला. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून कॅप्टन्सी काढून घेत हार्दिक पांड्याकडे सोपवली. काही दिवसांपूर्वीत हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सला सोडून मुंबईत ट्रेड ऑफद्वारे सामील झाला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.