CWG 2022 : लोव्हलिनाच्या वैयक्तिक प्रशिक्षकांना अखेर मिळाला प्रवेश

Lovlina Borgohain personal coach Sandhya Gurung accreditation for the Commonwealth Games
Lovlina Borgohain personal coach Sandhya Gurung accreditation for the Commonwealth GamesEsakal
Updated on

बर्मिंगहम : भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लोव्हलिना बोरगोहैनच्या (Lovlina Borgohain) प्रशिक्षक संध्या गुरूंग (Sandhya Gurung) अखेर राष्ट्रकुल स्पर्धेच्या (Commonwealth Games) ठिकाणी प्रवेश मिळाला आहे. ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती लोव्हलिनाने काल सोशल मीडिया पोस्ट करत आपला मानसिक छळ होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर भारतीय क्रीडा मंत्रालय आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी या प्रकरणात लक्ष घालून लोव्हलिनाच्या प्रशिक्षक यांना स्पर्धेच्या ठिकाणी पाठवण्याची त्वरित सोय करावी अशी विनंती भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला (IOA) केली होती.

Lovlina Borgohain personal coach Sandhya Gurung accreditation for the Commonwealth Games
PHOTO'S : सॅमीचा 'कार्निवल क्वीन' पत्नीसोबत 'किलर' लूक

संध्या गुरूंग या भारतीय संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक आहेत. त्यांना स्पर्धेच्या आदल्या दिवशी राष्ट्रकुलसाठी जाणाऱ्या चमूत समावेश करण्यात आला. रविवारी त्या बर्मिंगहम (Birmingham) येथील राष्ट्रकुल स्पर्धेच्या व्हिलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. त्यांच्याकडे अॅक्रेडिएशन नसल्याने हा प्रवेश नाकारण्यात आला होता. यानंतर लोव्हलिनाने मानसिक छळाची पोस्ट करताच प्रशासन खडबडून जागे झाले.

आता भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने पीटीआयला माहिती दिली की, 'संध्या आज बॉक्सिंग व्हिलेजमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांना अॅक्रेडिएशन देण्यात आले आहे. आता त्या संघासोबत आहेत.' गुरूंग यांना आता गेम व्हिलेजमध्ये एक रूम देखील देण्यात आली आहे.

लोव्हलिनाने सोमवारी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्यात लोव्हलिना 'मला खूप दुःख झाले आहे. माझा सतत मानसिक छळ सुरू आहे. ज्या प्रशिक्षकांनी मला ऑलिम्पिक पदक मिळवण्यात मदत केली. जे प्रशिक्षक माझ्या कायम पाठीशी राहिले त्यांना सातत्याने डावलले जात आहे. यामुळे माझ्या प्रशिक्षणावर परिणाम होत आहे.' असे म्हणाली. लोव्हलिनाने गुरूंग यांना तिला टोकियो ऑलिम्पिकपूर्वी मानसिक दबावातून बाहेर काढले होते. गुरूंग आणि लोव्हलिना राष्ट्रकुल स्पर्धेत दाखल होण्यापूर्वी 15 दिवस आयर्लंडमध्ये सराव करत होते.

Lovlina Borgohain personal coach Sandhya Gurung accreditation for the Commonwealth Games
Badminton Tournament : ग्रामीण क्षेत्रातही बॅडमिंटन खेळ रुजण्याची गरज

दरम्यान, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने वक्तव्य प्रसिद्ध केले की, नियमानुसार खेळाडूंच्या 33 टक्के सपोर्ट स्टाफ नेण्यास परवानगी असते. भारतीय बॉक्सिंग चमूत 12 खेळाडू आहेत. त्यात 8 पुरूष आणि 4 महिला खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे नियमानुसार त्यांच्यासोबत 4 सपोर्ट स्टाफ सदस्य पाठवता येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.