पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भेट देण्यात आलेल्या स्मृतीचिन्हांचा ऑनलाईन पद्धतीने लिलाव सुरू आहे. यामध्ये पहिल्याच दिवशी 10 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या निविदा आल्याने जबरदस्त प्रतिसाद मिळाल्याच दिसतंय. ही लिलाव प्रक्रिया संपण्यासाठी अद्याप 19 दिवस बाकी आहेत.
टोक्यो ऑलिम्पिक 2020 संपल्यानंतर भारताच्या खेळाडूंनी पंतप्रधानांना काही भेटवस्तू दिल्या होत्या. यामध्ये कांस्यपदक विजेत्या लव्हलिना बोर्गोहेनच्या (lovlina borgohain)ग्लोव्हजचा समावेश होता. त्यासाठी लावलेल्या 11 बोलींपैकी सर्वाधिक 1.92 कोटी रुपयांची बोली होती. यासाठी मूळ किंमत 80 लाख ठरवण्यात आली. मात्र आतापर्यंत लावण्यात आलेल्या बोलीमध्ये ही रक्कम सर्वाधिक आहे.
पुढील सर्वाधिक बोली सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राच्या (Neeraj Chopra) भाल्याची होती. त्यासाठी 1 कोटी रुपयांची मूळ किंमत ठरवण्यात आली होती. आतापर्यंत या भाल्यावर 1.55 कोटींची बोली लावण्यात आली आहे. यासाठी आणखी एका व्यक्तीने सर्वाधिक 1,00,08,000 रुपयांची बोली लावली आहे.
यानंतर महिला हॉकी कर्णधार राणी रामपालच्या स्टिकसाठी 1,00,00,100 रुपयांची बोली होती. ज्याची मूळ किंमत 80 लाख रुपये ठरवण्यात आली होती. टोकियो 2020 मध्ये भारतीय महिला हॉकी संघ चौथ्या क्रमांकावर होता. वाढदिवसानिमित्त होणाऱ्या लिलावातील रक्कम 'नमामी गंगे' या केंद्राच्या प्रकल्पासाठी दिली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.