भारतातलं वास्तव! ऑलिंपिक पदक निश्चितीमुळे लवलिनाच्या गावाला मिळाला रस्ता

बॉक्सर लवलिना बोर्गोहेनच्या (Lovlina Borgohain) कामगिरीमुळे समस्त देशवासियांना आनंद झाला आहे. लवलिनाच्या या जबरदस्त प्रदर्शनामुळे तिच्या गावाचाही फायदा झाला आहे.
भारतातलं वास्तव! ऑलिंपिक पदक निश्चितीमुळे लवलिनाच्या गावाला मिळाला रस्ता
Updated on

गुवहाटी - टोक्यो ऑलिंपिकमध्ये (tokyo Olympics) पदक निश्चित करणाऱ्या बॉक्सर लवलिना बोर्गोहेनच्या (Lovlina Borgohain) कामगिरीमुळे समस्त देशवासियांना आनंद झाला आहे. लवलिनाच्या या जबरदस्त प्रदर्शनामुळे तिच्या गावाचाही फायदा झाला आहे. लवलिनाच्या गावात आता चांगला रस्ता बांधला (road construction) जाणार आहे. ३० जुलैला लवलिनाने वेल्टरवेट वर्गात चीनच्या (china) निन-चिन चेनचा पराभव करुन पदक निश्चित केले. त्यानंतर लवलिना आणि तिचे आसाममधील गोलघाट जिल्ह्यातील बारोमुठिया गाव चर्चेत आले.

बारोमुठिया गावापासून लवलिनाच्या घरापर्यंत जाणारा रस्ता अनेक वर्ष दुर्लक्षित आणि खूपच वाईट स्थितीमध्ये होता. गावापासून लवलिनाच्या घरापर्यंत चिखलाने भरलेला कच्चा रस्ता होता. आता सार्वजनिक बांधकाम खात्याने पदकासह लवलिना घरी परतण्याआधी पक्का रस्ता बांधला आहे. स्थानिक आमदार बिस्वजीत फुकान यांनी लवलिनाच्या घरापर्यंत रस्ता बांधणीसाठी पुढाकार घेतला. आधीच रस्ता हा खूप खराब स्थितीमध्ये होता, असे त्यांनी सांगितले.

भारतातलं वास्तव! ऑलिंपिक पदक निश्चितीमुळे लवलिनाच्या गावाला मिळाला रस्ता
"योगींना ठोकता येतं, अखिलेश यादवांनी जपून रहावं" - साक्षी महाराज

"हा रस्ता म्हणजे लवलिना बोर्गोहेनसाठी एक भेट आहे. लवलिना सुवर्णपदक घेऊन मायदेशी परतावी, यासाठी मी आसामच्या जनतेला आणि देशवासियांना प्रार्थना करण्याचे आवाहन करतो. छोट्या जिल्ह्यातून येणाऱ्या मुलींसाठी लवलिना एक प्रेरणास्त्रोत आहे. या भागात जागतिक दर्जाचे क्रीडा इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. आसामचे मुख्यमंत्री आम्हाला मदत करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे" असे बिस्वजीत फुकान म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.