LSG Jersey Launch : केएल राहुलच्या LSG नवी जर्सी झाली लँच; चाहत्यांना झाली डेक्कन चार्जर्सची आठवण

LSG Jersey Launch
LSG Jersey Launch ESAKAL
Updated on

LSG Jersey Launch : केएल राहुलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल 2023 च्या हंगामासाठी आपल्या नव्या कोऱ्या जर्सीचे अनावर केले. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्या हस्ते लखनौ सुपर जायंट्सच्या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. यावेळी संघाचा कर्णधार केएल राहुलसह दीपक हुड्डा आणि जयदेव उनाडकट हे देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे चाहत्यांना लखनौची जर्सी ही डेक्कन चार्जर्सच्या जर्सीसारखीच वाटत आहे.

LSG Jersey Launch
MS Dhoni : धोनीची कारकीर्द संपण्याच्या मार्गावर होती… दादाचे एक बलिदान अन् घडला इतिहास

लखनौ सुपर जायंट्सची नव्या जर्सीचे अनावरण होताच ती सगळीकडे व्हायरल देखील झाली. यानंतर या जर्सीवर फॅन्सच्या कमेंट यायला लागल्या. अनेक चाहत्यांनी नारंगी आणि आकाशी रंगाचा वापर करण्यास सांगितले तर एका चाहत्यांना पांढरा आणि निळा रंग हे दोन चांगले पर्याय असल्याचे सांगितले. तर एका चाहत्यांना तुमच्या जर्सीत काळ्या रंगाचा वापर करण्याचाही सल्ला दिला. लखनौने पारंपरिक निळा रंग आणि त्यात साईड पॅनलला लाल रंगाच्या छटा वापरल्या आहेत.

LSG Jersey Launch
IND vs AUS : इंदूर कसोटीचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या क्रीडा पत्रकाराचा हॉटेलमध्ये सापडला मृतदेह

लखनौ सुपर जायंट्स आपला पहिला हंगाम 2022 मध्ये खेळला होता. पहिल्याच हंगामात केएल राहुलच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्सने तिसरे स्थान पटकावले. त्यांनी 17 सामन्यांपैकी 9 सामने जिंकले होते. 2023 मध्ये देखील लखनौ अशीच कामगिरी करण्यासाठी उत्सुक असेल.

केएल राहुलने आपली कसोटी आणि टी 20 संघातील जागा गमावली असून त्याला यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करावी लागणार आहे. राहुलने 2022 च्या हंगामात 600 पेक्षा जास्त धावा ठोकल्या होत्या. आता अशाच प्रकारची कामगिरी त्याला पुन्हा करावी लागणार आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.