Para athletes Bhagyashree Jadhav Paralympic 2024 : पॅरिसमध्ये २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत पॅरालिम्पिक स्पर्धा होत आहेत. भारत यंदा ८४ खेळाडूंसह सर्वात मोठा दल पॅरिसमध्ये पाठवणार आहे. टोकियो पॅरिलिम्पिक स्पर्धेत भारताच्या १४ महिलांसह एकूण ५४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यंदा ३२ महिला खेळाडूंसह एकूण ८४ जणं सहभागी होत आहेत. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने ५ सुवर्ण, ८ रौप्य व सहा कांस्यसह एकूण १९ पदकं जिंकली होती.
या स्पर्धेत भारतीय दलाच्या ध्वजवाहकाचा मान महाराष्ट्राच्या भाग्यश्री जाधव यांच्यासह भालाफेकपटू सुमित अंतिल यांना मिळाला आहे. १९८५ मध्ये महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवादाज येथे भाग्यश्रीचा जन्म.. २००६ मध्ये एका अपघाताने तिला व्हिलचेअरवर बसवले आणि ती प्रचंड मानसिक दडपणात गेली होती. पण, तिने गोळाफेकीचा खेळ निवडला आणि डिप्रेशनवर मात केली. २०२२च्या आशियाई पॅरा स्पर्धेत तिने रौप्यपदक जिंकले. फेजा वर्ल्ड कपमध्ये कांस्यपदक, जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत दोन कांस्यपदकं आणि २०१७च्या पुणे महापौर स्पर्धेत दोन सुवर्ण व एक कांस्यपदक तिने जिंकले.
Full list of Indian athletes at the Paralympic Games
तिरंदाजी ( ६) - हरविंदर सिंग ( वैयक्तिक व मिश्र रिकर्व्ह, गट - ST), राकेश कुमार ( वैयक्तिक व मिश्र कम्पाऊंड - गट W2), श्याम सुंदर स्वामी ( वैयक्तिक व मिश्र कम्पाऊंड - गट ST), पूजा ( वैयक्तिक व मिश्र रिकर्व्ह - गट ST), सरिता ( वैयक्तिक व मिश्र कम्पाऊंड -गट W2), शीतल देवी ( वैयक्तिक व मिश्र कम्पाऊंड - गट ST)
दीप्ती जिवांजी ( ४०० मी. T20), सुमित अंतिल ( भालाफेक F64), संदीप ( भालाफेक - F64), अजीत सिंग ( भालाफेक - F46) सुंदर सिंग गुरजर ( भालाफेक - F46), रिंकू ( भालाफेक - F46 ), नवदीप ( भालाफेक - F41), योगेश कथूनिया ( थाळीफेक- F56), धरमबीर, प्रणव सूर्मा व अमित कुमार ( क्लब थ्रो - F51), निशाद कुमार व राम पाल ( उंच उडी - T47), मरियप्पन थांगावेलू, शरद कुमार व शैलेश कुमार ( उंच उडी - T63), सचिन खिलारी, मोहम्मद यासेर व रोहित कुमार ( गोळाफेक - F46), प्रिथी पाल ( १०० व २०० मी. - T35), भाग्यश्री जाधव ( गोळाफेक - F34), मनू ( गोळाफेक - F37), प्ररवीण कुमार ( भालाफेक - F57), रवी रोंगाली ( गोळाफेक - F40), संदीप संजय गुरजर ( भालाफेक -F64), अरविंद ( गोळाफेक - F35), दीपेश कुमार ( भालेफेक - F54), प्रवीण कुमार ( उंच उडी - T64), दीलिप गावित ( ४०० मी. - T47), सोमन राणा ( गोळाफेक - F57), होकाटो सेमा ( गोळाफेक - F57), साक्षी कसन ( थाळीफेक- F55), करमज्योती ( थाळीफेक - F55), रक्षिता राजू ( १५०० मी. -T11), अमिषा रावत ( गोळाफेक - F46), भवानीबेन चौधरी ( भालाफेक - F46), सिमरन ( १०० मी. व २०० मी. - T12), कांचन लखानी ( थाळीफेक- F53)
मनोज सरकार ( एकेरी- SL3), नितेश कुमार ( एकेरी SL3 व मिश्र दुहेरी SL3-SU5), कृष्णा नगर ( एकेरी SH6), शिवराजन सोलैमालाई ( एकेरी व दुहेरी SH6), सुहास याथिराज ( एकेरी SL4 व मिश्र दुहेरी SL3-SU5), सुकांत कदम ( एकरी S4), तरुण ( एकेरी S4), मानसी जोशी ( एकेरी SL3), मनदीप कौर ( एकेरी SL3), पलक कोहली ( एकेरी SL4 व मिश्र दुहेरी SL3-SU5), मनिषा रामदास ( एकेरी - SU5), थुलासिमाथी मुरुगेसन ( एकेरी SU5 व मिश्र दुहेरी SL3-SU5), नित्या शिवन ( एकेरी SH6 व मिश्र दुहेरी SH6)
प्राची यादव ( एकेरी २०० मी. VL2), यश कुमार ( कयाक सिंगल २०० मी. KL1), पूजा ओझा ( कयाक सिंगल २०० मी. -KL1)
सायकलिंग ( २) - अर्शद शेक व ज्योती गदेरिया
ब्लाईंड ज्यूदो ( २)- कपिल परमार व कोकिला
पॉवरलिफ्टिंग ( ४) - परमजीत कुमार ( ४९ किलो), अशोक ( ६३ किलो), सकिना खातून ( ४५ किलो), कस्तुरी राजामणी ( ६७ किलो)
रोईंग ( २) - अंतिला, नारायणा कोंगानापल्ले
नेमबाजी ( १०) - आमीर भट, अवनी लेखरा, मोहन अगरवाल, निहाल सिंग, मनिष नरवाल, रुद्राक्ष खांडेलवाल, सिद्धार्थ बाबू, श्रीहर्षा रामकृष्णा, स्वरूप उन्हाळकर, रुबिना फ्रान्सिस
जलतरण - सुयश जाधव
टेबल टेनिस - सोनाल्बेन पटेल, भाविनाबेन पटेल
टायक्वांडो - अरुणा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.