Parth Mane : महाराष्ट्राच्या 'पार्थ'ने जग जिंकले! १६ वर्षीय नेमबाजाचा Junior World Championship मध्ये सुवर्णवेध

लिमा, पेरू येथे सुरू असलेल्या ISSF Junior World Championship मध्ये महाराष्ट्राच्या पार्थ माने याने संयम आणि अचूकतेचा उल्लेखनीय प्रदर्शन करताना सुवर्णपदक जिंकले.
Parth Mane
Parth Mane esakal
Updated on

लिमा, पेरू येथे सुरू असलेल्या ISSF Junior World Championship मध्ये महाराष्ट्राच्या पार्थ माने याने संयम आणि अचूकतेचा उल्लेखनीय प्रदर्शन करताना सुवर्णपदक जिंकले. १६ वर्षीय पार्थ माने याने ज्युनियर पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले. पार्थने २५०.७ गुणांसह हे पदक जिंकले. पार्थ याने भारताच्या माजी नेमबाज सुमा शिरूर यांच्या Lakshya Shooting Club मध्ये प्रशिक्षण घेत आहे.

पार्थने ६२७.७ गुणांसह चौथ्या पात्रता फेरीत अव्वल स्थान पटकावले होते. त्यानंतर अंतिम फेरीत त्याने आपले कौशल्य दाखवून दिले. त्याने चीनच्या हुआंग लिवानलीनचा ०.७ गुणांनी पराभव करून सुवर्णपदकावर नाव कोरले. हुआंगला २५०.० गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. हुआंगने या स्पर्धेत मिश्र गटाचे एक सुवर्णपदक आधीच नावावर केले आहे. अमेरिकेच्या ब्रेडन वेयनने २२९.१ गुणांसह कांस्यपदक जिंकले.

आश्चर्यकारक म्हणजे जागतिक विजेता आणि पॅरिस ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता स्वीडनचा व्हिक्टर लिंडग्रेन हा चौथ्या स्थानावर राहिला. भारताच्या अजय मलिक आणि अभिनव शॉ यांनीही दमदार कामगिरी केली. अजयने १८ शॉट्सनंतर १८६.७ गुणांसह पाचवे, तर अभिनवने १४ शॉट्सनंतर १४४.२ गुणांसह सातवे स्थान मिळवले.

गेल्या वर्षीच्या चांगवॉन ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पणात तो १० मीटर एअर रायफलमध्ये ६२५.४ गुणांसह १७व्या स्थानावर राहिला होता. या वर्षाच्या सुरुवातीला, त्याने ग्रॅनाडा ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत रौप्य आणि जकार्ता आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळवले.

पार्थ म्हणाला, “ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन म्हणून खूप छान वाटतं. जरी माझी पात्रता गुण माझ्या अपेक्षेइतके चांगले नसले तरी फायनल खरोखरच चांगली झाली. शेवटच्या दोन अंतिम शॉट्समध्ये मी फक्त आपला खेळ करण्यापलिकडे वेगळे काही केले नाही आणि याची मला मदत झाली. मी पुढील वर्षापासून वरिष्ठ गटात स्पर्धा करण्यास उत्सुक आहे.”

ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताने आतापर्यंत एकूण १० पदकं जिंकली आहेत. यात ६ सुवर्ण, १ रौप्य व ३ कांस्यपदकांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.