National Games 2022 : पठ्ठ्या लढत असताना प्रशिक्षकावर काळाचा घाला; सुवर्णपदक आले मात्र...

Maharashtra boxer Nikhil Dubey won gold
Maharashtra boxer Nikhil Dubey won goldesakal
Updated on

National Games 2022 : महाराष्ट्राचा बॉक्सर निखील दुबेने गांधीनगर येथे झालेल्या नॅशनल गेम्स स्पर्धेत मध्यम वजनीगटात सुवर्ण पदक पटकावले. मात्र या सुवर्णपदकाचा जल्लोष मात्र करण्यात आला नाही. कारण निखीलच्या प्रशिक्षकांचे निखीलचा सामना पाहण्यासाठी येत असताना रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाले होते. (Maharashtra boxer Nikhil Dubey won gold)

Maharashtra boxer Nikhil Dubey won gold
T20 World Cup India Squad : ब्रेट ली म्हणतो; भारताने एक मोठी चूक केली, ऑस्ट्रेलियात त्यांनी...

निखीलने सुवर्णपदक पटकावल्यानंतर आकाशाकडे पाहिले आणि आपल्या मार्गदर्शकाला धनंजय तिवारींना अभिवादन केले. ज्यावेळी सोमवारी निखीलने क्वार्टर फायनल सामना जिंकला. त्यावेळी त्याने मुंबईत असलेल्या आपल्या मार्गदर्शक आणि प्रशिक्षक असलेल्या धनंजय तिवारी यांना फोन केला. निखीलचा पुढचा सामना हा नॅशनल चॅम्पियन सुमित कुंदूसोबत होता.

प्रशिक्षक तिवारी आपल्या पठ्ठ्याला नॅशनल चॅम्पियन असलेल्या बॉक्सरशी कसा दोन हात करतो हे पाहण्यासाठी उत्सुक होते. त्यांनी आपली बुलेट काढली आणि मुंबईहून गांधीनगरच्या दिशेने निघाले. मात्र वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांचा अपघात झाला. इकडे निखीलने 75 किलो वजनीगटातील आपला सामना जिंकला होता. मात्र तोपर्यंत प्रशिक्षक तिवारींनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, निखीलने अंतिम फेरी देखील जिंकली आणि त्याच्या गळ्यात सुवर्णपदक चमकू लागले. मात्र निखील या पदकाचे सिलेब्रेशन करू शकला नाही.

Maharashtra boxer Nikhil Dubey won gold
BCCI President Election : CSK चे सर्वेसर्वा श्रीनिवासन यांनी गांगुलीची गेम केली?

याबाबत भावुक झालेला निखील म्हणला की, 'माझ्या प्रशिक्षकांच स्वप्न होतं की मी कुंदूविरूद्धचा सामना जिंकावा आणि सुवर्णपदकाचा सामना खेळावा. मी सोमवारी त्यांच्याशी बोललो त्यावेळी मी त्यांना माझा सामना कुंदूशी होणार असल्याचे सांगितले. ते खुप उत्साहित झाले आणि ते माझा सामना पाहण्यासाठी त्यांच्या बुलेटला किक मारून निघाले. त्यांनी मला सांगितले होते की माझ्यात कुंदूला पराभूत करण्याची क्षमता आहे.'

निखील दुबने आपल्या प्रशिक्षकांना दिलेले वचन पाळले. त्याने मिझोरमच्या मलसावमटलुआंगाचा 5 - 0 असा पराभव करत बुधवारी सुवर्ण पदक जिंकले. निखील म्हणतो की, 'माझ्या प्रशिक्षकांचे निधन झाल्याचे ऐकून मला धक्का बसला. एक क्षण मला असे वाटले की मी अंतिम सामना कसा खेळू शकतो. मात्र त्यांची माझ्याकडून एकच अपेक्षा होती. ती म्हणजे सुवर्ण पदकाची.'

आता निखील दुबे थेट मुंबईला प्रशिक्षक तिवारींच्या अंत्यविधीला जाणार आहे. निखील म्हणाला 'तिवारींना कायम त्यांच्या बुलेटवरून मोठा प्रवास करण्याती सवय होती. ते अनेकवेळा बुलेटवरून गोव्याला देखील गेले होते. ते गांधीनगरकडे येत असताना तिसऱ्या लेनमधून गाडी चालवत होते. अचानक पहिल्या लेनमधून ट्रॅक्टर आडवा आला आणि त्यांना धडक दिली.'

Maharashtra boxer Nikhil Dubey won gold
Women's Asia Cup Semi Final 1 : निम्मा संघ गारद करत थायलंडने भारताला 148 धावात रोखले

गेल्या आठ वर्षापासून धनंजय तिवारी निखील दुबेला आपल्या अॅकेडमीत प्रशिक्षण देत होते. याचबरोबर त्यांनी निखीलला आर्थिक सहाय्य देखील केले. भावूक होऊन निखील म्हणाला की, 'ज्यावेळी मी बॉक्सिंग सुरू केले त्यावेळी धनंजय तिवारी हे माझे सिनियर होते. त्यांनी माला कायम पाठिंबा दिला. त्यांनी फक्त बॉक्सिंग रिंगमध्येच नाही तर आयुष्याच्या रणांगणावरही मार्गदर्शन केले. माझ्या कुटुंबाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. मात्र ते माझ्या पाठीशी आठ वर्ष उभे राहिले. मी पश्चिम मलाडच्या धनंजय बॉक्सिंग क्लबमध्ये प्रशिक्षण घेतले.'

22 वर्षाच्या निखीलवर पहिल्यांदाच दुःखाचा डोंगर कोसळलेला नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्याने आपल्या वडिलांना प्रेमनाथ यांना गमावले. आता निखीलचे भाऊ शाकलेश, अभिषेक आणि दीपक त्याच्या बॉक्सिंग करिअरसाठी मदत करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()