Junior National Kho-Kho Championship: महाराष्ट्राला सुवर्णचा दुहेरी मुकुट; साताराचा प्रसाद अन् सांगलीची वेदिका सर्वोत्कृष्ट खेळाडू

34th Sun Junior National Kho Kho Championship: ३४व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी संघाने विजेतेपद पटकावले आहे.
Maharashtra Teams at 34th Junior National Kho Kho Championship
Maharashtra Teams at 34th Junior National Kho Kho ChampionshipSakal
Updated on

पुष्पुर येथील अलबर्ट एक्का स्टेडियमवर सुरू असलेल्या ३४व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी संघाने विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादित केला.

किशोर गटाचे सलग ९वे तर किशोरी गटाचे ७वे विजेतेपद आहे. साताराचा प्रसाद बळीप सर्वोत्कृष्ट खेळाडूचा भरत पुरस्काराचा तर सांगलीच्या वेदिका तामखडे ही इला पुरस्काराची मानकरी ठरले.

Maharashtra Teams at 34th Junior National Kho Kho Championship
Kho Kho Competition : नेरूरकर करंडक खो-खोत पुण्याला दुहेरी मुकुट

महाराष्ट्र विरुद्ध तेलंगणा हा मुलांचा अंतिम सामना अतिशय अटीतटीचा झाला. मध्यंतराला १ गुणांनी पिछाडीवर असलेल्या महाराष्ट्र संघाने २४-१५ असा सामना जिंकला.

महाराष्ट्र संघाकडून भीमसिंग वसावे २.०० मी. व१ गडी, श्री दळवी १.१०, ०.५० मी. व १ गडी, प्रसाद बळीप १.००, २.०० मी. व ३ गडी, सचिन थोरात १.१०, १.०० मी. व १ गडी, विनायक भांगे १.२० मी. अशी सांघिक कामगिरी बजावली.

Maharashtra Teams at 34th Junior National Kho Kho Championship
Kho-Kho World Cup : खो-खो विश्‍वकरंडकाला पुन्हा धुमारे ; महाराष्ट्र संघटनेच्या सभेत आयोजकांना विश्‍वास, निवडणूक बिनविरोध

महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने १८ गुणांनी सहज विजय मिळवला. मध्यंतराला १४-४ अशी आघाडी घेत महाराष्ट्रने २६-८ असा सामना जिंकला.

महाराष्ट्र संघाकडून वेदिका तामखडेने पहिल्या पाळीत ५ मिनिटे संरक्षण केले. तिला सिद्धी भोसले १.३० मी. ३.५० मी व ५ गडी बाद करत मोलाची साथ दिली. श्रावणी तामखडेने नाबाद ३.०० मी. संरक्षण करताना २ गडी बाद केले तर गौरी जाधवने ३ गडी बाद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()