केरळ येथे झालेल्या वरिष्ठ महिला गटाच्या एकदिवसीय करंडक साखळी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

जम्मू-काश्मीर संघाचा १४५ धावांनी पराभव
cricket
cricketsakal
Updated on

पुणे : तिरुअनंतपुरम, केरळ येथे झालेल्या वरिष्ठ महिला गटाच्या एकदिवसीय करंडक साखळी क्रिकेट स्पर्धेत कर्णधार देविका वैद्य आणि तेजल हसबनीसने केलेल्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्राने जम्मू-काश्मीर संघाचा १४५ धावांनी पराभव केला. एलिट ‘क’ गटातून महाराष्ट्राने पाच विजयासह २० गुणांसह बाद फेरी गाठली. त्यांची आता त्रिपुराशी उपांत्यपूर्व फेरीत बडोद्यात २२ जानेवारीला लढत होईल.

स्पोर्ट्स हब आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या या सामन्यात जम्मू-काश्मीर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय जम्मू-काश्मीर संघाच्या पथ्यावर पडला नाही. महाराष्ट्राने पाच बाद २९० धावा केल्या. यांत देविका वैद्य, तेजल हसबनीस, अनुजा पाटील यांचा मोलाचा वाटा होता. देविका-तेजल या जोडीने चौथ्या विकेटसाठी १०७ चेंडूंत १०८ धावांची, तर देविकाने-अनुजाच्या साथीत पाचव्या विकेटकरिता ६७ चेंडूंत ७८ धावांची भागीदारी रचली. देविकाचे शतक मात्र अवघ्या दोन धावांनी हुकले.

देविकाने ८५ चेंडूंत तेरा चौकारांसह ९८ धावांची खेळी केली. तेजलने ८८ चेंडूंत बारा चौकारांसह ७७ धावांची, तर अनुजाने ४७ चेंडूंत चार चौकारांसह नाबाद ४७ धावांची खेळी केली.प्रत्युत्तर देताना जम्मू-काश्मीर संघाला निर्धारित ५० षटकांत ४ बाद १४५ धावाच करता आल्या. त्यात चित्रासिंह जामवालने ९६ चेंडूंत सात चौकारांसह ५९ धावांची खेळी केली.

धावफलक

महाराष्ट्र - (५० षटकांत) ५ बाद २९० (देविका वैद्य ९८, तेजल हसबनीस ७७, अनुजा पाटील नाबाद ४७, सरला देवी २-४०, संध्या २-५७) विजयी विरुद्ध जम्मू-काश्मीर - (५० षटकांत) ४ बाद १४५ (चित्रासिंह जामवाल ५९, शिवांती गुप्ता नाबाद ३२, ए. एन. तोमर ४०, खुशी मुल्ला १-१६, आरती केदार १-१६, देविका वैद्य १-२१).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.