Maharashtra Kesari 2023 : कुस्तीच्या फडातून फडणवीसांचा राजकीय शड्डू; कुस्तीपटूंवरही केला आश्वासनांचा वर्षाव

Maharashtra Kesari 2023 Devendra Fadnavis
Maharashtra Kesari 2023 Devendra Fadnavisesakal
Updated on

Maharashtra Kesari 2023 Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात होत असलेल्या 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या व्यासपीठावरून राजकीय शड्डू ठोकला. याचबरोबर महाराष्ट्रातील कुस्टीपटूंवर आश्वासनांचा वर्षाव देखील केली. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा धागा पकडत टोलेबाजी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी आपण देखील राजकारणात कुस्ती खेळतो. मात्र ती टीव्हीवरची आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात झालेले सत्तांतर असे म्हणत त्यांनी कुस्तीच्या मैदानातून राजकीय शड्डू देखील ठोकला. याचबरोबर फडणवीसांनी हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी यांच्या मानधनात देखील वाढ करण्याची घोषणा व्यासपीठावरून केली.

Maharashtra Kesari 2023 Devendra Fadnavis
Maharashtra Kesari: माजी विजेत्या सदगीरला पराभवाचा धक्का! शिवराज राक्षे किताबासाठी लढणार

देवेंद्र फडवणीस काय म्हणाले?

फडणवीसांनी कुस्तीच्या मैदानातून राजकीय फटकेबाजी देखील केली. ते म्हणाले की, आम्ही पण राजकारणात कुस्ती करतो, पण ती फक्त टीव्हीवर असते. याचे ताजे उदारहण म्हणजे महाराष्ट्रातील सत्तांतर.

यानंतर फडणवीसांनी खाशाबा जाधवांचा उल्लेख करत महाराष्ट्राला ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत पदक मिळवण्यात अपयश का येते असा सवाल केला. तसेच त्यांनी बृजभूषण यांना उद्येशून तुमच्या मदतीने महाराष्ट्र मिशन ऑलिम्पिक सुरू करणार असल्याचे देखील सांगितले. त्यांनी यावेळी महाराष्ट्रातील पैलवान नक्कीच ऑलिम्पिक पदक पटकावणार असा विश्वास देखील बोलून दाखवला.

Maharashtra Kesari 2023 Devendra Fadnavis
Maharashtra Kesari : शिवराज राक्षेनं महेंद्रला दाखवलं अस्मान; पहिल्या दोन मिनिटातच झाला महाराष्ट्र केसरी

यानंतर फडणवीस यांनी राज्यातील पैलवानांच्या मानधनाच्या विषयाला देखील हात घातला. त्यांनी खेळाडूंना 2 वर्षे मानधन मिळाले नसल्याचे सांगत आधीच्या महाविकास आघाडीला अप्रत्यक्षरित्या चिमटा काढला.

फडणवीसांनी संधीचा फायदा घेत हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानांचे मानधन 6 हजारावरून 20 हजार करण्याचे आश्वासन देखील दिले. याचबरोबर वयोवृद्ध खेळाडूंचे अडीच हजार मानधन हे साडेसात हजार करणार असल्याचेही सांगितले. फडणवीसांनी महिला केसरीसाठी देखील राज्य सरकार प्रयत्न करणार असे आश्वासन दिले.

(Sports Latest News)

हेही वाचा : पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.