Maharashtra Kesari Controversy: ''व्हिडिओ उगाच व्हायरल झाला नाही...; पुन्हा येणार अन्...''

सिकंदर शेख; महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांचा निर्णय चुकलाच
Maharashtra Kesari Controversy sikandar shaikh
Maharashtra Kesari Controversy sikandar shaikh
Updated on

Maharashtra Kesari 2023 : हार-जीत खेळाचा भाग आहे. मात्र, जाब न विचारल्यास असेच सुरू राहणार. हे थांबायचे असेल, तर आज प्रश्न विचारणे गरजेचे असल्याचे सांगत पै. सिकंदर शेख याने पंचांनी दिलेला निर्णय चुकीचा असल्याचे आज येथे पुन्हा सांगितले. यापुढे अधिक जोमाने तयारी करेन आणि निर्विवादपणे महाराष्ट्र केसरीची गदा शाहू विजयी गंगावेश तालमीमध्ये आणेन, असा निर्धारही सिकंदरने व्यक्त केला. (Maharashtra Kesari Controversy 2023 Sikandar Shaikh vs Mahendra Gaikwad Kusti)

Maharashtra Kesari Controversy sikandar shaikh
Maharashtra Kesari : नवीन महाराष्ट्र केसरी फेडरेशन तयार करणार - रमेश बारसकर

नुकत्याच संपलेल्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सिकंदर याचा पै. महेंद्र गायकवाड याने उपांत्य सामन्यात पराभव केला होता. या कुस्तीतील पंचांच्या निर्णयाबाबत तीन दिवसांनंतरही उठलेली चर्चेची धूळ शांत झालेली नाही. उपांत्य लढतीतील गुण बरोबर की चूक यावर समाज माध्यमांवर जोरदार चर्चा रंगली आहे. स्पर्धेनंतर सिकंदर शेख सराव करत असणाऱ्या कोल्हापूर येथील शाहू विजयी गंगावेश तालमीत आज परतला.

Maharashtra Kesari Controversy sikandar shaikh
Maharashtra Kesari Controversy : "मी कोणाच्या बापाला घाबत नाही..." ; 'त्या' ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?

स्पर्धेच्या निकालाबाबत त्याने तो निकाल चुकीचा असल्याचा पुन्हा एकदा दावा केला. सिकंदर म्हणाला, ‘‘कुस्तीप्रेमींकडून समाज माध्यमांवर व्हायरल होणारा व्हिडिओ उगाच व्हायरल झाला नाही. जे घडले ते चुकीचेच होते, याची अनेकांना जाणीव आहे. केवळ एका बाजूनेच व्हिडिओ बघून निर्णय घेताना दुसऱ्या बाजूचा विचार न करणे, तसेच प्रशिक्षकाला देखील बाजूला करणे हे समजण्यापलीकडचे आहे. 

मुळातच गायकवाडला दिलेले गुण दोघांचेही होते. असे असूनही एका बाजूने निकाल लागणे चुकीचे आहे. प्रत्येक पैलवानाला अन्यायाबद्दल विचारण्याचा हक्क आहे. माझ्यावर अन्याय झाला, असे मला वाटते म्हणून मी विचारतोय. आज हे विचारले नाही, तर पुढच्या काळातही हे चालत राहील. हार- जीत होतच राहणार; मात्र माझा संघर्ष सुरूच राहील.’’

Maharashtra Kesari Controversy sikandar shaikh
Maharashtra Kesari 2023: महाराष्ट्र केसरीत पंच राहिलेल्या मारूती सातवला धमकीचा फोन?

महेंद्रला दिलेले चार गुण योग्यच : गुंड

‘महाराष्ट्र केसरी’च्या मैदानात पैलवान सिकंदर शेखविरुद्धच्या लढतीत पैलवान महेंद्र गायकवाडला दिलेले चार गुण योग्य आहेत. सिकंदर धोकादायक स्थितीत असल्याने ते देण्यात आले आहेत. ज्यांना सिकंदरवर अन्याय झाला आहे, असे वाटते ते त्यांचे अज्ञान आहे. त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाकडे दाद मागावी, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र केसरी कुस्ती अधिवेशनाचे स्पर्धाप्रमुख प्रा. दिनेश गुंड यांनी ‘सकाळ’ला दिली. कोथरूडमध्ये महाराष्ट्र केसरीचे मैदान झाले. माती विभागात सिकंदर विरुद्ध महेंद्र लढत काटाजोड झाली. गुणांकनात सिकंदरवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली असून, सोशल मीडियावर महेंद्रला चार गुण कसे दिले, यावर प्रश्‍न उपस्थित झाला आहे. त्यासंदर्भात गुंड यांच्याशी संपर्क साधला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()