Maharashtra Kesari: यंदाचा महाराष्ट्र केसरीचा थरार पुण्यातच!

कोथरूड येथे १० ते १४ जानेवारी दरम्यान स्पर्धा रंगणार
 Maharashtra Kesari Tournament In Pune From January 10 To 14
Maharashtra Kesari Tournament In Pune From January 10 To 14sakal
Updated on

Maharashtra Kesari 2022 : महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची ''महाराष्ट्र केसरी'' कुस्ती स्पर्धा १० ते १४ जानेवारी या कालावधीत पुण्यात रंगणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाची संधी संस्कृती प्रतिष्ठानला मिळाली आहे. कै. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी, किनारा हॉटेल जवळ, कोथरूड, पुणे येथे हा थरार अनुभवायला मिळणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस व कुस्ती स्पर्धेचे मुख्य संयोजक व संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 Maharashtra Kesari Tournament In Pune From January 10 To 14
Team India: रोहित शर्माच्या कर्णधारपदाला धोका, राहुल द्रविडच काय...

यावेळी रामदास तडस म्हणाले, "अत्यंत चुरशीची समजल्या जाणाऱ्या ''महाराष्ट्र केसरी''चे हे ६५ वे वर्ष आहे. या स्पर्धेत खेळण्याचे प्रत्येक मल्लाचे स्वप्न असते. वर्षभर त्यासाठी मल्ल तयारी करत स्पर्धेची वाट पाहत असतात. यंदा ही स्पर्धा भव्य स्वरूपात होणार असून, सलग पाच दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. राज्यभरातील मल्ल एकमेकांशी भिडणार आहेत. ४७ तालीम संघातील ९०० मल्ल सहभागी होतील. विविध दहा वजनी गटात, माती आणि गादी विभागात या कुस्त्या होतील.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘कै. मामासाहेब मोहोळ यांच्या संकल्पनेतून आणि दूरदर्शी विचारातून ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा सुरु झाली. या स्पर्धेची जबाबदारी आम्हा मोहोळ कुटुंबीयांकडे आली, ही आनंदाची बाब आहे. ''महाराष्ट्र केसरी''ची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या मामासाहेब मोहोळ यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. समारोप व बक्षीस वितरणासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री गिरीश महाजन, भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषणसिंग हे चौदा तारखेला उपस्थित राहणार आहेत. या वेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीचे चेअरमन संजय कुमारसिंह, काका पवार, संदीप भोंडवे, योगेश दोडके, हनुमंत गावडे, विलास कथुरे आदी उपस्थित होते.

आखाडा, मैदानाचे उद्घाटन

६५ व्या ''महाराष्ट्र केसरी''साठी कोथरूडमधील कै. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी सज्ज झाली आहे. ३० एकर जागेवर कुस्तीचा हा कुंभमेळा भरणार आहे. या मैदानाचे उद्घाटन मंगळवारी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते झाले. भव्य दिव्य स्वरूपात ही कुस्ती स्पर्धा होणार असून, माती व गादी विभागाचे आखाडे, ७० हजार लोक बसतील एवढी आसनव्यवस्था येथे करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.