Maharashtra Kesari: यंदा महाराष्ट्र केसरी पुण्यात! 'या' दिवशी प्रेक्षकांना बघायला मिळणार कुस्तीचा थरार

६६व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यात येणार आहे. कुस्तीच्या लढती नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात खेळवण्यात येतील.
Sikandar Sheikh
Sikandar Sheikhsakal

Maharashtra Kesari Pune 2023:६६व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन यंदा पुण्याच्या वाघोलीतील लोणीकंद फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्कुलच्या मैदानावर आयोजित कऱण्यात येणार आहे. १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान हे सामने खेळवले जातील. या स्पर्धेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सामटीव्हीने दिली.

मागच्या वर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा उपांत्य फेरीच्या लढतीत पंचाच्या निर्णयावर काहींनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. ज्यानंतर हा वाद पुर्ण महाराष्ट्रभर पेटला होता. ही लढत गंगावेश तालमीतील सिंकदर शेख आणि सोलापुरच्या महेंद्र गायकवाड यांच्या खेळवण्यात आली होती. यामध्ये महेंद्र गायकवाड याने सिंकदरवर 'बाहेरची टांग' डाव टाकला. यावर पंचांनी महेंद्रला गुण दिले होते. सिंकदरला ही लढत गमवावी लागली होती.

त्यानंतर पुण्याच्या शिवराज राक्षे आणि सोलापुरच्या महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम लढत खेळवण्यात आली. ज्यात शिवराजने महेंद्रवर विजय मिळवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com