फुल नाही फुलाची पाकळी तर द्यायची; महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजची नाराजी

Wrestler Prithviraj Patil)
Wrestler Prithviraj Patil)Sakal
Updated on

Maharashtra Kesari 2022 : महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब पटकवणारा कोल्हापुरचा मल्ल पृथ्वीराज पाटील (Wrestler Prithviraj Patil) सध्या चर्चेत आहे. राज्यातील प्रतिष्ठित स्पर्धा जिंकून त्याने मानाची चांदीची गदा उचलली. पण त्याला बक्षीसाची रक्कम मिळालेली नाही. फुल नाही फुलाची पाकळी तरी मिळायला हवी होती, अशा शब्दांत खुद्द पृथ्वीराज पाटील याने आयोजकांवर नाराजी व्यक्त केली आहे.

शनिवारी साताऱ्याच्या आखाड्यात रंगलेल्या रोमहर्षक लढतीत मुंबई पूर्वचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या विशाल बनकरला एका गुणाने पराभूत करत पृथ्वीराजनं महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवला होता. यावेळी त्याला चांदीची गदा आणि टायटल मिळाले, पण रोख स्वरुपात बक्षीसाची रक्कम मिळालेली नाही, असे पृथ्वीराजनं म्हटलं आहे.

Wrestler Prithviraj Patil)
बक्षीस रक्कमेबाबत आयोजकांची टोलवाटोलवी; पृथ्वीराजसाठी शिवेंद्रराजे सरसावले

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत बक्षीसासंदर्भात गोंधळ निर्माण होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही अशाच गोष्टींचा सामना पैलवानांनी केला आहे. पुन्हा एकदा ती गोष्ट अनुभवायला मिळाली. आयोजकांकडून निराशा पदरी पडलेल्या मल्लाला भाजप पक्षानं दिलासा देण्याचं काम केलं आहे. विधानसभा विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराजला पक्षाकडून 5 लाख रुपये रोख रक्कम देण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजकांकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. स्पर्धेतील विजेत्याला रोख रक्कमेच्या स्वरुपात किती रक्कम दिली जाते, हे आधीच ठरलेले नसते. पण आयोजकांकडून त्याला मानधनाच्या स्वरुपात काहीतरी रक्कम मिळावी हा एक अलिखित नियम आहे. आयोजकांना याचा विसर पडल्याचे दिसते.

Wrestler Prithviraj Patil)
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजला लाखाचा धनादेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.