राज्यातील सत्तानाट्याला पुर्णविराम मिळाला असला तरी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. पक्षविरोधात बंड पुकारत सत्तेच्या गादीवर एकनाथ शिंदे विराजमान झाले आणि राज्यातील राजकारणाला नवं वळण मिळालं आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष राजकीय पटलाकडे अधिक वेधले आहे. अशातच नेहमी ट्विट करत विरोधकांवर टीकास्त्र सोडणारे संजय राऊतांनी कोल्हापूरच्या विंबल्डन गर्लचे कौतुक करत राजकारण रोजचेच आहे... त्या पलीकडे देखील जग आहे... असे म्हटले आहे. राजकारण सोडून राऊतांनी ट्विट केल्यामुळे त्यांचे हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे.(Maharashtra Politics is everyday Sanjay Raut)
एशियन टेनिस फेडरेशनतर्फे इंग्लंड येथे होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेसाठी कोल्हापूरची टेनिसपटू ऐश्वर्या जाधव हिची आशियाई संघात निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी निवड झालेली ऐश्वर्या जाधव हे देशातील एकमेव खेळाडू आहे. दिल्ली येथे झालेल्या वर्ल्ड ज्युनिअर टेनिस स्पर्धेतून या संघाची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये १४ वर्षांखालील गटात दोन मुले आणि दोन मुलींची निवड करण्यात आली आहे.
ऐश्वर्या ही कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनची खेळाडू आहे आणि छत्रपती शाहू विद्यालयाची ती विद्यार्थिनी आहे. तिला प्रशिक्षक अर्षद देसाई, मनाल देसाई आदींचे मार्गदर्शन आहे. विम्बल्डन स्पर्धेसाठी भारताच्या ऐश्वर्या जाधवसह अझुना इचीओका-जपान, झांगर नुरलानुल-कझाकिस्तान, सी हॅयुक चो-कोरीया यांचा समावेश करण्यात आला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.