Kavita Raut: Savarpada Express सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कविता राऊतने आदिवासी असल्याने आपल्यावर अन्याय केला जात असल्याचा संताप व्यक्त केला. राज्य सरकारच्या नोकरीसाठी डावलले जात असून सरकार दुजाभाव करत असल्याची भावना तिने बोलून दाखवली आहे.
'आदिवासी असल्यामुळे मला शासकीय नोकरीपासून वंचित ठेवण्यात आलं आहे. माझ्या पाठिशी कुणीही गॉड फादर नाही. नोकरीसाठी अनेकदा अर्ज देऊन देखील माझ्या अर्जांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. माझ्यापेक्षा कमी गुण आणि खेळात कमी श्रेणी असलेल्या खेळाडूंना शासकीय नोकरी देण्यात आली आहे,' असा गंभीर आरोप कविाने सरकारवर केला आहे.
माझ्या पाठीमागे गॉड फादर नसल्याने मला डावललं जात आहे. नोकरीसाठी १० वर्ष पाठपुरावा करूनही दुर्लक्षित ठेवले गेले, असेही ती म्हणाली. महाराष्ट्रात राहून मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे आणि यासाठी मी महाराष्ट्र सरकारकडे नोकरी मागतेय. जुन्या GR नुसार माझ्या बरोबरीच्या खेळाडूंना नोकरी दिली, तशी मलाही द्यावी, असेही ती म्हणाली.
पेसा भरतीवरून आदिवासी बांधव आक्रमक झाले असताना कविताने केलेल्या दाव्याने राजकारण पेटण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये पेस भरती संदर्भातील आंदोलनात काही जणांनी राजकारण केल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कळवणचे आमदार नितीन पवार यांनी केला.
पण, कविताच्या आरोपानंतर आमदार हिरामण खोसकर आणि माजी आमदार जेपी गावित यांनी देखील सरकारवर भेदभाव केल्याचे आरोप केले आहेत. आदिवासी १७ संवर्ग पेसा पदभरतीचा मुद्दा चांगलाच चिघळला आहे. जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विकास भवन येथे मागील ४ दिवसांपासून आदिवासी उमेदवारांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुंबईत बैठक पार पडणार आहे.
कविताने २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेत १०००० मीटर शर्यतीत भारताला कांस्यपदक जिंकून दिले. २०१०च्या आशियाई स्पर्धेतही तिने १० मीटरचे रौप्य व ५००० मीटरचे कांस्यपदक जिंकले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.