मुंबई, ता. १७ : हर्षित माहीमकरला महाराष्ट्र राज्य खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी मुकुटाची संधी निर्माण झाली आहे. १७ वर्षांखालील मुले व पुरुष अशा दोन्ही विभागात हर्षितने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे या दोन्ही विभागात त्याच्याकडे अजिंक्यपद पटकावण्याची संधी असणार आहे.