महाराष्ट्राचे दोन्ही संघ गटात अव्वल; राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत ओडिसा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, पंजाबचे विजय

किशोर विभागामध्ये ओडिसाने कोल्हापूरचा २८-२४ असा ४ गुण आणि २.३० मि. राखून विजय मिळवला.
maharashtra team male and female national kho kho team rank 1st sport
maharashtra team male and female national kho kho team rank 1st sport Sakal
Updated on

टिपटूर (कर्नाटक) : महाराष्ट्राचे दोन्ही संघ (किशोर-किशोरी) राष्ट्रीय खो-खो स्पर्धेच्या साखळी फेरीत गटात अव्वल स्थानावर राहिले. मेघालय व नागालँड हे प्रतिस्पर्धी संघ अनुपस्थित राहिल्यामुळे महाराष्ट्राच्या संघांना पहिल्या स्थानावर कायम राहता आले. कर्नाटकमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. किशोर विभागात ओडिसा, उत्तर प्रदेश; तर किशोरी विभागात यजमान कर्नाटकसह पंजाबने विजयी वाटचाल सुरू ठेवली.

किशोर विभागामध्ये ओडिसाने कोल्हापूरचा २८-२४ असा ४ गुण आणि २.३० मि. राखून विजय मिळवला. ओडिसाच्या बापून हंसदा (३ मि. संरक्षण व २ गुण), बिजय तुईका (१.१५, १.२० मि. संरक्षण), बिकाराम मोहंती (नाबाद १.३० मि. संरक्षण व २ गुण) यांनी चांगला खेळ केला. कोल्हापूरच्या कार्तिक फरकटे (२.१० मि. संरक्षण व ३ गुण) याने अष्टपैलू खेळ केला.

याच विभागात उत्तर प्रदेशने गोव्याचा २८-१४ असा एक डाव १४ गुणांनी एकतर्फी विजय मिळवला. विजयी संघाच्या देव कुमार (५.३० मि. संरक्षण व २ गुण), अनुप (२.५०, १.२० मि. संरक्षण व ४ गुण), अमन चौहान (१.१० मि. संरक्षण व ६ गुण) यांनी धडाकेबाज खेळ केला. गोव्यातर्फे धीरज (१ मि. संरक्षण), दीपक (८ गुण) यांनी छान खेळ केला.

मणिपूर, ओडिसाचा पराभव

किशोरी विभागात यजमान कर्नाटकने मणिपूरचा ४२-६ असा एक डाव ३६ गुणांनी धुव्वा उडवला. कर्नाटकच्या विजया लक्ष्मी (नाबाद ७ मि. संरक्षण), निंगमा डी. (३.२० मि. संरक्षण), लावण्या व्ही. (२.३० मि. संरक्षण व १६ गुण),

maharashtra team male and female national kho kho team rank 1st sport
National School Kho-Kho Tournament: महाराष्ट्राची घोडदौड सुरूच! मुले, मुली संघाचा बादफेरीत प्रवेश

बी. फातिमा (८ गुण) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. मणिपूरकडून एल. अल्बीनाने (४ गुण) ठसा उमटवला. अन्य सामन्यात पंजाबने ओडिसाचा ३०-१८ असा १२ गुणांनी पराभव केला. खुषप्रित (३.००, १.१० मि. संरक्षण व २ गुण), हरमन कौर (१.२०, २ मि. संरक्षण व २ गुण), रजनी राणी (८ गुण) यांनी सर्वोत्तम खेळ करत पंजाब संघाकडून महत्त्वाची भूमिका बजावली. ओडिसातर्फे लिडीना नाथ (१.२० मि. संरक्षण), सुभसनरी मल्लिका (६ गुण) यांनी चांगला खेळ केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.