Carrom Tournament: ज्युनियर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे चारही संघ सज्ज

Junior National Carrom Championship: अखिल भारतीय कॅरम महासंघाच्या वतीने मध्यप्रदेश येथे ज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
Carrom
CarromSakal
Updated on

Maharashtra Carrom Teams: अखिल भारतीय कॅरम महासंघाच्या वतीने मध्यप्रदेश येथे ज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे चारही संघ सज्ज झाले आहेत.

या स्पर्धेमध्ये १८ वर्षांखालील मुले, २१ वर्षांखालील मुले, १८ वर्षांखालील मुली, २१ वर्षांखालील मुली या चार गटांमध्ये कॅरमपटूंना आपली चमक दाखवावी लागणार आहे.

Carrom
Carrom World Cup : पैशाअभावी नागपूरच्या कॅरमपटूची ‘अमेरिकावारी’ वांध्यात; निखिल लोखंडेची विश्‍वचषकासाठी झाली निवड

या स्पर्धेसाठी आठ मुले, आठ मुली व संघ व्यवस्थापक असा एकंदर १८ जणांचा महाराष्ट्राचा संघ ग्वालियर येथे रवाना झाला. सांघिक व वैयक्तिक अशा दोन विभागांमध्ये या संघातील खेळाडू सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्र कॅरम संघटनेच्या वतीने संघाला प्रत्येकी दोन टी शर्ट, दोन ट्राऊजर्स, वातानुकूलित रेल्वे प्रवास सवलत तसेच प्रत्येकी रुपये १,००० रुपये खर्चासाठी देण्यात आले आहेत. स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी संघाचे दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर मुंबईत घेण्यात आले होते. या स्पर्धेचा शेवट २६ सप्टेंबरला होणार आहे.

Carrom
Carrom Tournament : प्रशांत मोरे, काजलकुमारीला विजेतेपद ; राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत घवघवीत यश

महाराष्ट्राचा संघ :

१८ वर्षांखालील मुले (ज्युनियर गट) : १) कौस्तुभ जागुष्टे २) आयुष गरुड ३) महम्मद हसनैन अर्शद शेख ४) सार्थक केरकर ५) मुनावर अब्बास अन्वर अब्बास सय्यद ६) भाव्या सोलंकी.

२१ वर्षांखालील मुले (युथ गट) : १) शेख फैझान अब्दुल रहीमान २) अथर्व पाटील (राजेश निर्गुण, संघ व्यवस्थापक).

१८ वर्षांखालील मुली (ज्युनियर गट) : १) दीक्षा चव्हाण २) मधुरा देवळे ३) रुची माचीवाले ४) आर्या घाणेकर ५) सिमरन शिंदे ६) ज्ञानेश्वरी इंगुळकर.

२१ वर्षांखालील मुली (युथ गट) : १) केशर निर्गुण २) सखी दातार (संध्या देवळे, संघ व्यवस्थापक).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.