Ranji Trophy : महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात; विदर्भ उपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने

विदर्भाच्या क्रिकेट संघाने सोमवारी रणजी क्रिकेट करंडकातील एलिट अ गटातील लढतीत महाराष्ट्रावर १० विकेट राखून दणदणीत विजय मिळवला आणि २७ गुणांसह उपांत्यपूर्व फेरीत पाऊल ठेवण्याच्या दिशेने पाऊल टाकले.
maharashtra vs vidarbha ranji cricket trophy Vidarbha towards the quarter finals ​
maharashtra vs vidarbha ranji cricket trophy Vidarbha towards the quarter finals ​sakal
Updated on

पुणे : विदर्भाच्या क्रिकेट संघाने सोमवारी रणजी क्रिकेट करंडकातील एलिट अ गटातील लढतीत महाराष्ट्रावर १० विकेट राखून दणदणीत विजय मिळवला आणि २७ गुणांसह उपांत्यपूर्व फेरीत पाऊल ठेवण्याच्या दिशेने पाऊल टाकले. महाराष्ट्राला ११ गुणांवरच समाधान मानावे लागले असून त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

महाराष्ट्राने ३ बाद १८७ या धावसंख्येवरून सोमवारी दुसऱ्या डावाला सुरुवात केली. दिग्विजय पाटील ६८ धावांवर; तर आशय पालकर १७ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार केदार जाधव याने ४० धावांची,

अंकित बावणे याने ८४ धावांची आणि धनराज शिंदे याने ४० धावांची खेळी करीत महाराष्ट्राचा पराभव टाळण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली, पण कुणालाही मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा दुसरा डाव ३७१ धावांवरच आटोपला. आदित्य ठाकरे याने ५४ धावा देत पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

महाराष्ट्राकडून विदर्भासमोर फक्त २८ धावांचे आव्हान उभे ठाकले. अथर्व तायडे व ध्रुव शोरी या सलामीवीरांनी एकही विकेट न गमावता विदर्भाला विजय मिळवून दिला. अथर्व याने नाबाद ६ धावांची आणि ध्रुव याने नाबाद २२ धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक ः महाराष्ट्र- पहिला डाव २०८ धावा आणि दुसरा डाव ३७१ धावा (मुर्तझा ट्रंकवाला ८६, दिग्विजय पाटील ६८, केदार जाधव ४०, अंकित बावणे ८४, धनराज शिंदे ४०, आदित्य ठाकरे ५/५४) पराभूत वि. विदर्भ- पहिला डाव ५५२ धावा आणि दुसरा डाव बिनबाद २८ धावा. सामनावीर- आदित्य ठाकरे.

अ गटाची ताजी गुणतालिका

विदर्भ- २७ गुण

हरियाना- २४ गुण

सौराष्ट्र- २२ गुण

सर्व्हिसेस- २२ गुण

राजस्थान -१९ गुण

महाराष्ट्र- ११ गुण

झारखंड- १० गुण

मणिपूर- ०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()