Rohit Sharma : पाच वेळा इंडियन प्रीमियर लीग (IPL) चॅम्पियन मुंबई इंडियन्स (MI) ने अलीकडेच रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला संघाचा नवा कर्णधार म्हणून घोषित केले. फ्रँचायझीच्या या निर्णयामुळे चाहते खूपच निराश झाले आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला राग व्यक्त करत आहेत.
चाहत्यांची नाराजी पाहून संघाचे जागतिक संचालक महेला जयवर्धने यांनी वक्तव्य केले आहे. JIO सिनेमाला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, खरे सांगायचे तर हा एक कठीण निर्णय होता. आम्ही क्रिकेट चाहत्यांच्या भावनांचा आदर करतो. मला वाटतं प्रत्येकजण भावनिक असतो आणि आपण त्याचाही आदर केला पाहिजे. पण, त्याचवेळी फ्रँचायझी म्हणून तुम्हाला असे निर्णय घ्यावे लागतात.
संघातील रोहित शर्माच्या भूमिकेबद्दल तो पुढे म्हणाला, "पुढील पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी संघात रोहित शर्मा असणे आणि मैदानाबाहेर असणे हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तो खूपच अप्रतिम आहे. मी रो सोबत काम केले आहे. मुंबईने यापूर्वी सचिन (तेंडुलकर) सोबत असे केले आहे, जो तरुणांसोबत खेळला आहे. त्याने कोणाला तरी नेतृत्व दिले आहे. आणि मुंबई इंडियन्स योग्य दिशेने जात असल्याची खात्री केली.
पांड्याला 15 डिसेंबरला संघाचा नवा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले. गुजरात टायटन्सचा (जीटी) माजी कर्णधार रोहितची जागा घेईल, ज्याच्या नावावर पाच आयपीएल खिताब आहेत. पांड्याचा नोव्हेंबरमध्ये रिटेन्शन डेडलाइनपूर्वी जीटी ते एमआयमध्ये व्यवहार झाला होता.
रोहित शर्मानंतर कर्णधारपदासाठी मुंबई फ्रँचायझीने हार्दिक पांड्यावर विश्वास व्यक्त केला आहे. पांड्याने पहिल्याच सत्रात गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवले होते. गुजरात संघ 2022 हंगामात चॅम्पियन आणि 2023 मध्ये उपविजेता ठरला. पांड्याच्या जाण्यानंतर गुजरात टायटन्सने शुभमन गिलला कर्णधार बनवले आहे.
हार्दिक पांड्या हा मुंबई इंडियन्सचा पाचवा नियमित कर्णधार असणार आहे. त्याच्या आधी रोहित शर्मा, रिकी पाँटिंग, हरभजन सिंग आणि सचिन तेंडुलकर यांनी संघाचे नेतृत्व केले आहे.
मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. या संघाने आतापर्यंत 5 विजेतेपद पटकावले आहेत. सर्वाधिक आयपीएल जेतेपदे जिंकण्याच्या बाबतीत ही फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जच्या बरोबरीची आहे, चेन्नईनेही 5 विजेतेपदे जिंकली आहेत. तसेच चेन्नईचा संघ 6 वेळा उपविजेता ठरला आहे, तर मुंबई इंडियन्स फक्त एकदाच उपविजेता ठरला आहे. त्यामुळे सीएसके हा लीगमधील सर्वात यशस्वी संघ आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.