Dhoni 41th Birthday: धोनीने खेळाडूंना सांगितलं, 'आता देव सुद्धा तुम्हाला...' अन् घडला इतिहास

भारताचा महान कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज त्याचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे.
Dhoni 41th Birthday icc champions trophy 2013
Dhoni 41th Birthday icc champions trophy 2013sakal
Updated on

Happy Birthday MS Dhoni: महेंद्रसिंग धोनी आज त्याचा 41वा वाढदिवस साजरा करत आहे. माही नेहमी कूल कर्णधारपदासाठी ओळखला जातो. आपल्या कर्णधारपदाच्या बळावर त्याने टीम इंडियाला आयसीसीच्या तीनही मोठ्या स्पर्धांमध्ये विजय मिळवून दिला आहे. युवा खेळाडूंकडून चांगली कामगिरी करून घेण्याची क्षमता त्याच्याकडे असते. असेच काहीसे आपल्याला 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाहायला मिळालं होतं.(Dhoni 41th Birthday icc champions trophy 2013)

Dhoni 41th Birthday icc champions trophy 2013
धोनीच्या वाढदिवसादिवशी आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट

आईसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिप 2013 या स्पर्धेत टीम इंडियाकडे सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, गौतम गंभीर आणि झहीर खानसारखे दिग्गज खेळाडू नव्हते. यानंतरही भारताने फायनल जाऊन सामना जिंकला होता. या स्पर्धेत धोनीने रोहितला टीम इंडियाची सलामी करायची संधी दिली. यानंतर आपण तर पाहिलं आहे, रोहित चांगला खेळाडू म्हणून पुढे आला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या स्पर्धेत टीम इंडियाने एकही सामना न गमावता अंतिम फेरी गाठली होती. यादरम्यान फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार होता. इंग्लंड मध्ये पावसाचा त्रास त्यावेळेसही होता. 50 षटकांत ऐवजी पावसामुळे हा सामना 20 षटकांचा करण्यात आला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत केवळ 129 धावा केल्या. धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंड हा सामना सहज जिंकणार असं वाटत होतं.

पाऊस नाही पडला होता, थंडगार हवा सुटली होती, यावेळी आकाश ढगाळ होते. इंग्लंडचा निम्मा डाव झाल्यावर धोनीने युवा खेळाडूंना उत्साहित केले आणि सांगितले की, आकाशाकडे पाहू नका, देव येऊन हा सामना जिंकणार नाही. आपल्याला आपला सर्वोत्तम खेळ दाखवायचा आहे. यानंतर भारतीय गोलंदाजांनी पूर्ण उत्साहात गोलंदाजी केली. फायनलमध्ये टीम इंडियाला 5 धावांनी विजय मिळवून दिला. यासह धोनीच्या कारकिर्दीत आणखी एका आयसीसी ट्रॉफीची भर पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.