Mahindra Formula E Car : महिंद्रा फॉर्म्युला कारचं अनावरण, भारतात पहिल्यांदाच होणार Formula E

Mahindra car unveiled in Hyderabad first ever Formula E Prix race in India
Mahindra car unveiled in Hyderabad first ever Formula E Prix race in Indiaesakal
Updated on

Formula E Prix Mahindra Formula Car : तेलंगाणाचे विशेष मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी महिंद्राची फॉर्म्युला कारचे अनावरण केले. दर्गम चेरूवू पूलावर क्रीडा रसिकांच्या उपस्थितीत हे अनावरण करण्यात आले. यानंतर ती कार शहराच्या मध्यभागी असलेल्या हुसैन सागर तलावाजवळ ठेवण्यात आली. ही कार शहराच्या अनेक भागात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. भारतातील सर्वात पहिली फॉर्म्युला ई स्पर्धा पुढच्या वर्षी 11 फेब्रुवारीला हैदराबाद येथे होणार आहे.

Mahindra car unveiled in Hyderabad first ever Formula E Prix race in India
Hardik Pandya : सासु सासरे येती घरा तोची दिवाळी दसरा! पांड्याचा आनंद गगनात मावेना...

भारतात फॉर्म्युला ई स्पर्धा पहिल्यांदाच होणार आहे. या स्पर्धेबाबत जनजागृती करण्यासाठी महिंद्राची फॉर्म्युला कार ही प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. जगातील 12 शहरात होणाऱ्या स्पर्धेमध्ये भारतातील एकमेव शहर हैदराबादची निवड झाली आहे. 2.37 किलोमिटर ट्रॅक हा तेलंगाणा सचिवालय, एनटीऐर गार्डन आणि लुमबिनी पार्क पासून हुसैन तलावापर्यंत असणार आहे.

आयोजकांच्या मते फॉर्म्युला ई गेन 2 ही कार फॉर्म्युला वन कारच्या जवळ जाणारी कार आहे. फक्त ही कार इलेक्ट्रिक कार असणार आहे. या गाडीत 250 किलोवॅटची बॅटरी असणार आहे. ही गाडी 3 सकेंदात 0 ते 62 किलोमिटर वेग पकडते. या गाडीचा टॉप स्पीड 280 किलोमिटर प्रतीतास इतका आहे. ज्यावेळी ही गाडी फुल स्पीडमध्ये असेल त्यावेळी गाडीचा आवाज फक्त 80 डेसिबल इतकाच असणार आहे.

Mahindra car unveiled in Hyderabad first ever Formula E Prix race in India
Deepti Sharma : वॉर्निंग देऊनच 'मंकडिंग', अखेर वादावर दिप्ती बोललीच

या कारमध्ये हायब्रिड टायर्स वापरण्यात आले आहेत. हे टायर्स अशा प्रकारे तयार करण्यात आले आहेत की सर्व हवामानात ते शर्यत संपेपर्यंत टिकून राहतील. फॉर्म्युला ई प्रिक्सच्या 2014 पासून 100 यशस्वी शर्यती झाल्या आहेत. जागतिक स्तरावर या क्रीडा प्रकाराची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.