Manchester United : फुटबॉल स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने गेल्या महिन्यात प्रशिक्षक टेन हेग यांच्यावर नाराजी व्यक्त केल्यानंतर इंग्लिश क्लब मँचेस्टर युनायटेड सोडला आहे. त्यानंतर मँचेस्टर युनायटेड चाहत्यांना आणखी एक धक्का बसला आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोने साथ सोडल्यानंतर मालकांनी मँचेस्टर युनायटेड क्लब विकायला काढला आहे.
इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) क्लब मँचेस्टर युनायटेडने बुधवार 23 नोव्हेंबरला जाहीर केले की अमेरिकेच्या ग्लेझरने पदभार स्वीकारल्यानंतर 17 वर्षांनी क्लबची मालकी बदलण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ग्लेझर कुटुंब फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडचा मालक आहे.
अलीकडच्या काळात या क्लबची कामगिरी चांगली नसून चाहते त्यावेळी खुप नाराज झाले होते. या क्लबची किंमत सुमारे पाच अब्ज युरो (48586 कोटी रुपये) आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर ग्लेझर कुटुंबाने ते विकले तर अमेरिकन गुंतवणूकदार ते खरेदी करू शकतात. मँचेस्टर युनायटेडने एक निवेदन जारी करून सांगितले की ते आपली रणनीती बदलण्यास तयार आहे. ग्लेझर फॅमिली क्लबमधील नवीन गुंतवणूक, विक्री किंवा कंपनीचा समावेश असलेल्या इतर व्यवहारांसाठी त्याचे पर्याय खुले ठेवत आहे.
ग्लेझर्स कुटुंबाच्या वक्तव्यानंतर असा अंदाज वर्तवला जात आहे की 17 वर्षे हा क्लब चालवल्यानंतर हे कुटुंब आता मँचेस्टर युनायटेडला विकत आहे. 2013 पासून क्लबने प्रीमियर लीग जिंकलेली नाही. अॅलेक्स फर्ग्युसनपासून अनेक व्यवस्थापक आले आणि गेले, परंतु कोणीही तितके यशस्वी झाले नाही. अलीकडेच फुटबॉल स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोने क्लबबाबत वादग्रस्त मुलाखत दिली, ज्यासाठी कायदेशीर लढाई सुरू आहे. यानंतर रोनाल्डोने तात्काळ प्रभावाने क्लब सोडल्याचेही वृत्त आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.