Manju Rani : चालण्यात भारी 'मंजू राणी'; 10KM शर्यतीत जिंकले सुवर्णपदक! पॅरिस ऑलिंपिकमध्ये मिळणार संधी?

Manju Rani wins 10km gold at National Open Race Walking Competition marathi news
Manju Rani wins 10km gold at National Open Race Walking Competition marathi news sakal
Updated on

Manju Rani News : वीस किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत मंगळवारी सुवर्णपदक जिंकल्यानंतर पंजाबची आंतरराष्ट्रीय ॲथलिट मंजू राणीने बुधवारी सकाळी दहा किलोमीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून ११ व्या राष्ट्रीय ओपन चालण्याच्या स्पर्धेत वर्चस्व सिद्ध केले. यामुळे तिची आगामी पॅरिस ऑलिंपिकमध्ये होणाऱ्या मॅरेथॉन व चालणे अशा मिश्र स्वरूपाच्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी वाढली आहे.

Manju Rani wins 10km gold at National Open Race Walking Competition marathi news
Vidhu Vinod Chopra Son : विधू विनोद चोप्रांच्या मुलाचा मोठा विक्रम; 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय क्रिकेटपटू

२४ वर्षीय मंजूने ही शर्यत ४५ मिनीटे २० सेकंदात पूर्ण केली. हाँगझो आशियाई क्रीडा स्पर्धेत चालण्याच्या ३५ किलोमीटर मिश्र स्पर्धेत राम बाबूच्या साथीने मंजू राणीने ब्राँझपदक जिंकले होते. अँतलया (तुर्की) येथे २० व २१ एप्रिल रोजी होणाऱ्या चालण्याच्या जागतिक सांघिक स्पर्धेच्या दृष्टीने संभाव्य खेळाडूंची निवड करण्याच्या उद्देशाने भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने दहा किलोमीटरचा समावेश चंडीगडच्या स्पर्धेत केला. तुर्कीतील प्रथम २२ संघांना पॅरिस ऑलिंपिकसाठी थेट प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे मंजू राणीचे यश महत्त्वाचे आहे. तुर्कीच्या स्पर्धेसाठी खेळाडूंची अंतिम निवड मार्च महिन्‍यात करण्यात येईल, असे महासंघातर्फे स्पष्ट करण्यात आले.

Manju Rani wins 10km gold at National Open Race Walking Competition marathi news
Mayank Agarwal : कमबॅकची तयारी.... मयांक अग्रवालची आली पहिली प्रतिक्रिया

पुरुषांच्या दहा किलोमीटर शर्यतीतही पंजाबने वर्चस्व राखले. पंजाबच्या २२ वर्षीय साहिलने सुवर्णपदकाला गवसणी घालताना ३९ मिनीटे २५ सेकंद वेळ नोंदवली. पतियाळा येथे शिक्षण घेत असलेल्या साहिलने काल २० किलोमीटर शर्यतीत पाचवे स्थान मिळविले होते. २० किलोमीटर शर्यतीत ऑलिंपिकची पात्रता गाठणाऱ्या उत्तराखंडच्या परमजित सिंग बिश्तने ३९ मिनीटे ३६ सेकंदात रौप्य व दिल्लीच्या विकाश सिंगने ३९ मिनीटे ४७ सेकंदात ब्राँझपदक जिंकले.

Manju Rani wins 10km gold at National Open Race Walking Competition marathi news
India Vs England 2nd Test : इंग्लडंकडून खेळणाऱ्या पाकिस्तानी वंशाच्या बशीरचे कोच मात्र 'भारतीय'! कोण आहेत सिद्धार्थ लाहिरी?

विजयला ३५ किलोमीटर शर्यतीत अव्वलस्थान

पुरुषांच्या ३५ किलोमीटर शर्यतीत गोव्याच्या विजय विश्वकर्माने अव्वलस्थान प्राप्त करताना २ तास ३९ मिनीटे १९ सेकंदात शर्यत पूर्ण केली. गुजरातच्या सागर चंद्राला रौप्य तर हरियानाच्या देवेंदर सिंगला ब्राँझपदक मिळाले. महिलांची शर्यत उत्तर प्रदेशच्या वंदना पालने जिंकली. तिने ३ तास ११ मिनीटे ०६ सेकंद अशी वेळ घेतली. पंजाबच्या पूजा कुमारीने रौप्य व हरियानाच्या कोमलने ब्राँझपदक पटकाविले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.