मंकडिंगच्या नियमात होणार बदल; चेंडूला लाळ लावणे कायमचे बॅन?

Mankading and various cricket rules may changed in 2022
Mankading and various cricket rules may changed in 2022 esakal
Updated on

आर. अश्विनने आयपीएलच्या सामन्यात जोस बटलरला मंकडिंग (Mankading) द्वारे बाद केले होते. त्यावेळी क्रिकेट जगतात खिलाडू वृत्तीची मोठी चर्चा रंगली होती. आता क्रिकेटचे नियम (Cricket Rule) करणारी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेलबर्न क्रिकेट क्लबने (MCC) मंकडिंगमध्ये बदल (Mankading Rule Change) करण्याचा निर्णय घेतला आहे. नॉन स्ट्रईकर रन आऊटचा म्हणजेच मंकडिंगचा नियम बदलणार आहे.

Mankading and various cricket rules may changed in 2022
पुढच्या पिढीने 1000 विकेट्सचे स्वप्न बाळगू नये : अश्विन

नॉन स्ट्रयकर रन आऊट नियम हा यापूर्वी कलम 41 मध्ये मोडत होता. हे कलम (Unfair Play) मध्ये मोडत होते. प्रत्येक वेळी गोलंदाज मंकडिंगद्वारे नॉन स्ट्रायकर फलंदाजाला बाद करायचा त्यावेळी याबाबत चर्चा व्हायची. हे योग्य की अयोग्य अशी मत मतांतरे असायची. मात्र आता हा नियम (Unfair Play) कॅटेगरीमधून काढून आता तो कलम 38 धावबाद या कॅटेगरीमध्ये टाकण्यात येणार आहे. त्यामुळे मंकडिंगबाबतची योग्य अयोग्य चर्चाच बंद होईल. बाकी नियमाच्या वर्डिंगमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

याचबरोबर एमसीसी चेंडूवर लाळ (Saliva On Cricket Ball) लावण्यावर कायमची बंदी आणण्याचाही प्रस्ताव देणार आहे. एमसीसी चेंडूवर कोणतीही गोष्ट लावणे हे अवैध ठरवण्याची शक्यता आहे. हे चेंडूची स्थिती बदलण्यासारखे आहे. एमसीसीने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, 'नवीन नियमानुसार चेंडूवर लाळ लावण्याची परवानगी असणार नाही. बऱ्याचदा लाळेच्या नावाखाली चेंडूला गोड चिकट पदार्थ लावला जात होता. आता चेंडूला लाळ लावण्याची पद्धत देखील चेंडूशी छेडछाड या प्रकारात मोडणार आहे.

Mankading and various cricket rules may changed in 2022
दाक्षिणात्य अभिनेत्रीचं धोनी प्रेम; माहीचा फोटो शेअर करत म्हणाली...

याबाबत एमसीसीचे (Marylebone Cricket Club) लॉ मॅनेजर फ्रासेर स्टुवर्ट यांनी सांगितले की, 'क्रिकेट कोड ऑफ लॉ (Code of the Laws of Cricket) 2017 ला प्रसिद्ध झाले त्यानंतर खेळ झपाट्याने बदलला आहे. त्यानंतर 2019 ला पुन्हा त्यात बदल करण्यात आले आहेत. मात्र त्यात काही किरकोळ बदल करण्यात आले होते. बऱ्याच नियमांचे स्पष्टीकरण त्यात होते. आता 2022 च्या कोड ऑफ लॉमध्ये काही मोठे बदल असणार आहेत. हे बदल सध्या ज्या प्रकारे क्रिकेट खेळले जात आहे त्याला अनुसरून असतील.'

दरम्यान, एमसीसीच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले की, हे नियम आपल्या स्पर्धांमध्ये समाविष्ट करायचे की नाही हा निर्णय आयसीसी आणि क्रिकेट मंडळांवर अवलंबून असणार आहे.

Mankading and various cricket rules may changed in 2022
PAK vs AUS : खराब पिचवर वॉर्नर नाचला; व्हिडिओ व्हायरल
  • क्रिकेटच्या 'या' नियमांमध्ये बदल होण्याची शक्याता

झेलबाद होताना स्ट्राईक चेंजचा नियम बदलाणार

कलम 18.11 मध्ये काही बदल होणार आहेत. याबाबतची चाचणी 100 बॉल स्पर्धेत घेण्यात आली होती. ज्यावेळी फलंदाज झेलबाद होतो. त्यावेळी नवीन येणारा फलंदाज हा स्टायकरलाच येणार. जरी नॉन स्ट्रायकरचा फलंदाज स्ट्रायकर एंडला पोहचला असला तरी नवीन येणारा फलंदाजच पुढचा चेंडू खेळेल. ( जर षटक संपले नसले तर)

डेड बॉल

Law 20.4.2. 12 : खेळाच्या मैदानात जर एखादा व्यक्ती, प्राणी आणि इतर वस्तूमुळे अडथळा निर्माण झाला आणि त्याचा दुसऱ्या संघाला फटका बसणार असेल तर तो डेड बॉल देण्यात येईल. यात एखादा श्वान मैदानात धावत आला. बाहेरच्या गोष्टीमुळे अडथळा निर्माण झाला आणि त्याचा खेळावर परिणाम होणार असेल तर अंपायर हा चेंडू डेड बॉल म्हणून घोषित करू शकतात.

Law 21.4 : गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वीच स्ट्राईकवर असणाऱ्या फलदंजाला धावबाद करण्यासाठी चेंडू फेकला तर तो डेड बॉल देण्यात येईल

वाईड बॉल

Law 22.1 : सध्याच्या क्रिकेटमध्ये फलंदाजांची क्रीजमधील समांतर हालचाल वाढली आहे. ते चेंडू टाकण्यापूर्वीच सरकत असतात. यामुळे गोलंदाजांवर वाईड चेंडू देताना खूपदा अन्याय होतो. त्यामुळे नियम 22.1 मध्ये बदल करण्यात येण्याची शक्यता आहे.

स्ट्रायकरचा खेळण्याचा अधिकार

Law 25.8 : जर एखादा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडला असेल तर तो चेंडू फलंदजाला मारता येणार आहे. मात्र हा चेंडू मारताना त्या फलंदाजाचा बॅट किंवा तो फलंदाज खेळपट्टीवरच असला पाहिजे. जर तो खेळपट्टीच्या बाहेर गेला तर तो चेंडू अंपायर डेड बॉल देऊ शकतात. असा प्रकार चेंडू ज्यावेळी गोलंदाजाच्या हातातून निसटतो त्यावेळी घडतात. यापूर्वी तो चेंडू फलंदाजाला कोठूनही मारता येत होता. याचबरोबर ज्या चेंडूमुळे फलंदाजाला खेळपट्टी सोडणे भाग पडते तो चेंडू नो बॉल देण्यात येईल.

क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची अयोग्य हालचाल

Laws 27.4 and 28.6 : जर क्षेत्रक्षण करणाऱ्या संघातील खेळाडूने खेळ सुरू असताना अयोग्यरित्या हालचाल केली तर अंपायर तो चेंडू डेड बॉल देत होते. या चेंडूवर जर फलंदाजाने चांगला फटका मारला असला तरी त्याचे नुकसान व्हायचे. आता यासाठी फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 धावा पेनाल्टी म्हणून बहाल केल्या जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()