Manoj Tiwari on Ranji Trophy : 'BCCI ने रणजी ट्रॉफी बंद केली पाहिजे...' क्रीडामंत्र्यांच्या वक्तव्याने उडाली खळबळ

Manoj Tiwari on Ranji Trophy : रणजी ट्रॉफी ही भारतातील देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा आहे...
Manoj Tiwari on Ranji Trophy News Marathi
Manoj Tiwari on Ranji Trophy News Marathi sakal
Updated on

Manoj Tiwari on Ranji Trophy : एकीकडे भारतीय संघ सध्या इंग्लंडसोबत कसोटी मालिका खेळत असताना दुसरीकडे रणजी ट्रॉफीही भारतात खेळली जात आहे. रणजी ट्रॉफीमध्ये युवा खेळाडू चमकदार कामगिरी करत आहे. मात्र याच दरम्यान बंगालचे क्रीडा मंत्री आणि स्टार क्रिकेटर मनोज तिवारीने एक मोठं वक्तव्य करून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.

रणजी ट्रॉफी ही भारतातील देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा आहे. त्यात दरवर्षी हजारो खेळाडू सहभागी होतात. परंतु या स्पर्धेची चमक हरवत चाललेली पाहून तो खूप नाराज आहे. अशा स्थितीत ही स्पर्धा बंद व्हावी असे त्याने सांगितले.

Manoj Tiwari on Ranji Trophy News Marathi
Prithvi Shaw : 'टीम इंडियात पुनरागमन करण्यावर माझे लक्ष नाही...' शतक ठोकल्यानंतर पृथ्वी शॉचे धक्कादायक वक्तव्य

मनोज तिवारीने गेल्या महिन्यातच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला. आणि आता त्याने आपला शेवटचा प्रथम श्रेणी सामना फक्त ईडन गार्डन्सवर खेळणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याच्या कारकिर्दीची सुरुवात याच मैदानातून झाली असून त्याला याच मैदानावरुन आपली कारकीर्द संपवायची आहे.

Manoj Tiwari on Ranji Trophy News Marathi
SA20 2024 Final : काव्या मारनच्या फ्रँचायझीने परदेशात फडकावला झेंडा! दुसऱ्यांदा पटकावले विजेतेपद

पण, त्याला रणजी ट्रॉफीची खूप काळजी आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना त्याने लिहिले की, 'पुढील सीझनपासून रणजी ट्रॉफी कॅलेंडरमधून काढून टाकली पाहिजे. या स्पर्धेत अनेक चुका होत आहेत. एवढी मोठी स्पर्धा वाचवण्यासाठी अनेक गोष्टींवर काम करण्याची गरज आहे. या स्पर्धेचे आकर्षण आणि महत्त्व कमी होत आहे. हे सर्व पाहून मला खूप वाईट वाटते.

Manoj Tiwari on Ranji Trophy News Marathi
Ranji Trophy : 0, 0, 16, 8, 9, 1... कर्णधार अजिंक्य रहाणेसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद; आकडेवारीने उडाली खळबळ

मनोज तिवारी हा सध्या बंगालचा क्रीडा मंत्री आहेत आणि तो त्यांच्या देशांतर्गत संघाचे नेतृत्वही करत आहेत. आतापर्यंत त्याने 146 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 10124 धावा केल्या आहेत, ही खरोखरच एक मोठी उपलब्धी आहे. या कालावधीत त्याने 30 शतके आणि 45 अर्धशतकेही केली आहेत. याशिवाय त्याने 169 सामन्यांमध्ये 5581 धावा आणि 183 टी-20 मध्ये 3436 धावा केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()