Indian Football: स्टिमॅक यांच्या हाकालपट्टीनंतर भारतीय फुटबॉल टीमला मिळाला नवा कोच!

India Football Team Coach: अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत राष्ट्रीय पुरुष संघाच्या नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली.
India Football Team
India Football TeamSakal
Updated on

India Football Team Coach: भारतीय फुटबॉल संघाला फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या क्वालिफिकेशनच्या तिसऱ्या फेरीत पोहचण्यात अपयश आले होते. त्यानंतर प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांची हाकालपट्टी करण्यात आली होती. आता यानंतर महिन्याभरातच भारताच्या पुरुष फुटबॉल संघाला नवा प्रशिक्षक मिळाला आहे.

इंडियन सुपर लीगमध्ये एफसी गोवा संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या स्पेनच्या मानोलो मार्केझ यांना भारतीय पुरुष फुटबॉल संघाचेही मुख्य प्रशिक्षकपद सोपवण्यात आले आहे.

India Football Team
EURO 2024 : इंग्लंडच्या समर्थकांना पराभव जिव्हारी; स्टेडियम बाहेर स्पेनच्या फॅन्ससोबत फ्री स्टाइल तुफान हाणामारी, Viral video

स्टिमॅक यांची हाकालपट्टी केल्यानंतर अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारी समितीची शनिवारी बैठक झाली आणि त्यात मार्केझ यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

२०२४-२५ या मोसमासाठी मार्केझ एफसी गोवा, तसेच भारतीय संघ या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळतील. त्यानंतर ते केवळ भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील. मार्केझ यांची नियुक्ती करताना त्यांच्या प्रशिक्षपदाचा कालावधी किती असेल, हे मात्र फेडरेशनने स्पष्ट केले नाही.

India Football Team
Football Competition : ना सेलिब्रिटी... ना राजकारणी... युरोपमध्ये खेळाचीच महती

५५ वर्षीय मार्केझ हे एफसी गोवा संघाचे प्रशिक्षक असल्यामुळे त्यांना भारतीय फुटबॉलची चांगली ओळख आहे. तसेच ते २०२० पासून भारतात प्रशिक्षक म्हणून काम पाहात आहेत. त्यामुळे त्यांनी नजीकच्या काळात आलेले नवे खेळाडू आणि झालेले बदल पाहिले आहेत.

त्यांनी हैदराबाद एफसी संघाचेही मार्गदर्शन केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबाद एफसीला २०२१-२२ मध्ये आयएसएल कपही जिंकून दिला होता. त्यानंतर ते २०२३ साली एफसी गोवा संघाचे प्रशिक्षक झाले. तसेच त्यांना स्पेनमध्येही प्रशिक्षणाचा अनुभव आहे.

Crossword Mini:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.