Manu Bhaker reacts on Neeraj Chopra Tweet : नुकत्याच झालेल्या डायमंड लीग २०२४ मध्ये नीरज चोप्राने त्याच्या २०२४ च्या हंगामाचा शेवटचा सामना खेळला. पॅरिस ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या नीरजला डायमंड लीग विजेतेपदापासून १ सेंटीमीटरने मुकावे लागले. या हंगामात अपेक्षांची पूर्तता न झाल्यानंतर निराश असल्याचे नीरजने पोस्ट करत सांगितले. त्याने या पोस्टमध्ये हाताला दुखापत असल्याची माहिती पण दिली. त्याच्या या पोस्टवर पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती मनू भाकर हिने प्रतिक्रिया देत पुढील हंगामात आणखी यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याला डायमंड लीग फायनल २०२४ मध्ये १ सेंटीमीटरच्या फरकाने दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने तिसऱ्या प्रयत्नात ८७.८६ मीटर लांब भाला फेकला होता, जो ग्रॅनडाच्या अँडरसन पीटर्सपेक्षा ( ८७.८७ मी.) ०.०१ मीटर कमी अंतरावर पडला. अँडरसनने त्याच्या पहिल्याच प्रयत्नात इतक्या लांब भाला फेकला होता. जर्मनीच्या ज्युलियन वेबसला ८५.९७ मीटरसह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
त्याच्या या अपयशानंतर नीरजने सोशल मीडियावर पोस्ट करत सरावादरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाल्याचे सांगितले. नीरजने हाताच्या एक्सरेचा फोटो शेअर करत सांगितले की, दुखापतीमुळे ही स्पर्धा माझ्यासाठी आणखी आव्हानात्मक बनली आणि या हंगामाचा शेवट मला माझ्या अपेक्षेप्रमाणे करता आला नाही.
नीरजने पोस्टमध्ये लिहिले की, "२०२४ हंगाम संपत असताना, मी वर्षभरात शिकलेल्या प्रत्येक गोष्टीकडे मागे वळून पाहतो. या हंगामात मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. सुधारणा, अडथळे, मानसिकता आणि बरेच काही. सोमवारी मी सरावादरम्यान जखमी झालो आणि एक्सरेमध्ये माझ्या डाव्या हाताला दुखापत झाल्याचे दिसले. हे माझ्यासाठी आणखी एक वेदनादायक आव्हान होते. पण माझ्या टीमच्या मदतीने ब्रुसेल्समध्ये फायनलमध्ये सहभागी होऊ शकलो.
माझ्यासाठी ही वर्षातील शेवटची स्पर्धा होती आणि मला या हंगामाचा शेवट यशस्वी करायचा होता. परंतु मी माझ्या स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. असे असले तरी या हंगामामध्ये मी खूप काही शिकलो. मी आता पुनरागमनासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आणि तयार आहे. तुमच्या प्रोत्साहनाबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. २०२४ ने मला एक चांगला खेळाडू आणि व्यक्ती बनवले आहे. २०२५ मध्ये भेटू. जय हिंद." असेही तो पुढे म्हणाला
नीरजच्या या पोस्टवर पॅरिस ऑलिम्पिकमधील 'ब्रॉन्झ गर्ल' मनू भाकरने प्रतिक्रिया दिली आहे. मनु म्हणाली, "२०२४ च्या विलक्षण हंगामाबद्दल नीरज चोप्रा तुझं अभिनंदन. तू लवकरात लवकर बरा होशील आणि आगामी हंगामात तुला अधिक यश मिळेल अशी शुभेच्छा."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.