Champions League : कॅप्टन मार्सेलो रिअल माद्रिद सोडणार?

Marcelo may be End Relation With Champions League Winner Real Madrid
Marcelo may be End Relation With Champions League Winner Real Madridesakal
Updated on

पाचव्यांदा चॅम्पियन्स लीगवर आपले नाव करणाऱ्या रिअल माद्रिदचा (Real Madrid) कर्णधार मार्सोलो (Marcelo) आपला 16 वर्षाचा रिअल माद्रिद सोबतचा प्रवास आता संपवण्याची शक्यता आहे. ब्राझीलचा मार्सेलो हा रिअर माद्रिदचा 120 वर्षातला सर्वात डेकोरेटेड प्लेअर आहे. त्याने नुकताच चॅम्पियन्स लीगच्या (Champions League) फायनलमध्ये लिव्हरपूलचा 1-0 असा पराभव करत आपली 25 वी ट्रॉफी उंचावली होती. मार्सेलोला यंदाच्या हंगामात फार काळ खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याला 2021 - 22 च्या हंगामात लीग स्टेजमध्ये 12 वेळा खेळण्याची संधी मिळाली.

Marcelo may be End Relation With Champions League Winner Real Madrid
French Open : सलग 12 सेट जिंकणाऱ्या जोकोविचला नदाल रोखणार?

रिअल माद्रिद सोडताना मार्सेलो म्हणाला की, 'आजचा दिवस दुःखाचा नाही तर आनंदाचा आहे. आम्ही पुन्हा एकदा जगातील सर्वोत्तम चॅम्पियनशिप जिंकली आहे. मला स्वतःचा खूप अभिमान आहे. माझ्या कुटुंबीयांना देखील माझा अभिमान आहे. आम्ही सर्वांनी अनेक जादुई रात्री एकत्र जगल्या आहेत. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. माद्रिदचे भविष्य हे खूप चांगले आहे. त्यांच्याकडे चांगले युवा खेळाडू आहे. हाला माद्रिद.' मार्सेलो पुढे म्हणाला की, माझे आणि रिअर माद्रिदचे नाते संपलेले नाही. भविष्यात कदाचित मी वेगळ्या भुमिकेत क्लबशी जोडला जाऊ शकतो.

Marcelo may be End Relation With Champions League Winner Real Madrid
डॅरेन सॅमीला मिळाला पाक सरकारचा 'सितारा - ए - इम्तियाज' पुरस्कार

34 वर्षाच्या मार्सेलोने रिअल माद्रिदचे जवळपास 500 पेक्षा जास्त सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. त्याने सर्गियो रोमासकडून नेतृत्वाची धुरा देखील आपल्या खांद्यावर घेतली होती. रोमास गेल्या वर्षी पॅरिस सेंट जर्मनकडे गेला होता. मार्सेलोने 2007 मध्ये रिअल माद्रिदकडून पदार्पण केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.