Mariyappan Thangavelu Story: पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धा पॅरिसमध्ये खेळवली जात आहे. भारताचे ८४ खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतायेत, ज्यात ३२ महिला खेळाडूंचा समावेश आहे. पॅरालिम्पिक म्हणजे फक्त खेळांमधील चढाओढ नसते, तर असते प्रत्येक खेळाडूची एक वेगळी कहाणी सांगणारी स्पर्धा.
अशीच एक कहाणी आहे भारताच्या मरिय्यपन थंगवेलू याची. भारतासाठी तो पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीमध्ये सहभागी होणार आहे. तो यंदा तिसऱ्यांदा पदक जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्याच्याकडून भारताला मोठ्या अपेक्षा आहेत.
मरियप्पनने आत्तापर्यंत अनेक स्पर्धा जिंकल्यात आणि अनेक पुरस्कारही मिळवलेत. पण त्याचा हा प्रवास इथपर्यंत सोपा नव्हता.