Indian Football: प्रवास सोपा नसेल...! भारतीय फुटबॉल संघाच्या नव्या प्रशिक्षकांना इगोर स्टिमॅक यांचा सल्ला

Manolo has been appointed as the coach of the Indian football team: स्टिमॅक यांनी भारतीय फुटबॉल संघाचे नवे प्रशिक्षक मानोलो यांना शुभेच्छा दिल्या.
Manolo and Štimac
Manolo and Štimacsakal
Updated on

Igor Stimac: भारतीय फुटबॉल संघ नवनियुक्त प्रशिक्षक मनोलो मार्क्यूझ (Manolo Márquez) यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या सुरुवातीसाठी सज्ज झाला आहे. भारतीय फुटबॉलसाठी मागील बराच काळ हा वादाचा राहिला. माजी प्रशिक्षक इगोर स्टिमॅक (Igor Štimac) यांची अचानक हकालपट्टी केली गेली आणि त्यानंतर क्रोएशियाच्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूने भारतीय फुटबॉल महासंघाला (AIFF) न्यायलयात खेचण्याची भाषा केली. हा वाद सुरू असताना AIFF ने मार्क्युझ यांनी प्रशिक्षक म्हणून घोषणा केली आणि लगेचच स्टिमॅकने नव्या प्रशिक्षकाला मोलाचा सल्ला दिला..."या पुढचा प्रवास सोपा नसेल, नव्या प्रशिक्षकाला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा,''असे स्टिमॅक यांनी म्हटले.

भारताला फिफा वर्ल्ड कप २०२३च्या पात्रता स्पर्धेत समाधानकारक कामगिरी करता आली नाही. सोपा ड्रॉ मिळूनही भारतीय संघ तिसरी पात्रता फेरी पार करण्यात अपयशी ठरला. स्टिमॅक यांनी भारतीय फुटबॉल संघाचे नवे प्रशिक्षक मानोलो यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, प्रिय मानोलो, भारताच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन. हा प्रवास सोपा नसेल, पण भारतीय खेळाडूंसोबतचा असलेला तुमचा अनुभव महत्त्वाचा ठरेल. म्हणूनच ब्लू टायगर्सला पुढच्या स्तरावर नेण्यासाठी तुम्ही सर्वात योग्य आहात! तुम्हाला खूप शुभेच्छा."

Manolo and Štimac
Paris Olympic 2024 : आयफेल टॉवरच्या धातूतून बनली ऑलिंपिकची पदके

ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन आणि स्टिमॅक यांच्यातील करार हा अचानकपणे संपुष्टात आला. हा निर्णय एकतर्फी अन् अन्यायकारक हा असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील भारताच्या खराब कामगिरीसाठी AIFF ला जबाबदार धरत स्टिमॅक यांनी, १० दिवसाच्या आत थकबाकी द्यावी अन्यथा फिफा ट्रेब्युनलकडे तक्रार करेन, अशी धमकी AIFF ला दिली आहे.

ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन यांनी शुक्रवारी जाहीर केले की, मानोलो आता २०२४-२५ मध्ये इंडियन सुपर लीग आणि राष्ट्रीय संघ यांच्या व्यवस्थापनाची दुहेरी भुमिका पार पाडतील.

कोण आहेत मानोलो..?

मोर्क्युझ मानोलो हे मुळचे स्पॅनिश आहेत आणि त्यांनी बार्सिलोनामध्ये फुटबॉलपटू म्हणून आपल्या कारकीर्दिला सुरूवात केली. त्यांनी युट होर्टा, सीएफ बादालोना अशा क्लबचे प्रतिनिधीत्व केले आहे. वयाच्या २८ व्या वर्षी त्यांनी खेळाडू म्हणून राजीनामा दिला. त्यानंतर २००२ मध्ये ते व्यवस्थापनेकडे वळाले. पीबी अंग्वेरा संघासोबतच सेंगुडा बी, लास पालमास अॅथलेटिको, क्रोएशिअन इस्त्रा १९६१ असा संघांचे त्यांनी व्यवस्थापक म्हणून काम केले आहे.

इंडियन सुपर लीगमधील हैदराबाद एफसीच्या मुख्य प्रशिक्षकपदी ते ३१ ऑगस्ट २०२० ते २८ मार्च २०२३ पर्यंत होते. २०२३-२४ च्या हंगामासाठी एफसी गोवाच्या प्रशिक्षकपदाचा कारभार त्यांनी स्वीकारला व त्यानंतर आता त्यांची २० जुलै २०२४ पासून भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Manolo and Štimac
Paris Olympic शेवटची स्पर्धा! दोन वेळचा सुवर्णपदक विजेता अँडी मरेचा टेनिसला अलविदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.