सहा वेळच्या विजेत्या मेरी कोमने वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून घेतली माघार

Mary Kom withdraw from World Boxing Championships
Mary Kom withdraw from World Boxing Championships esakal
Updated on

ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती बॉक्सर मेरी कोमने (Mary Kom) या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप (World Championships) आणि आशियाई स्पर्धेत (Asian Games) न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मेरी कोमने हा निर्णय तरूण खेळाडूंना अधिक संधी मिळावी यासाठी घेतला आहे. सहा वेळीची वर्ल्ड चॅम्पियन मेरी कोम आता बर्मिंगहॅममध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेवर लक्ष केंद्रीत करणार आहे.

Mary Kom withdraw from World Boxing Championships
पाक कॅप्टनच्या गोड मुलीसोबत भारतीय महिला खेळाडूंचा सेल्फी

यांदाची आयबीए महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप ही 6 मे ते 21 मे रोजी इस्तांबूल येथे होणार आहे. तर राष्ट्रकूल स्पर्धा जुलै 28 तर आशियाई स्पर्धा 10 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मेरी कोने भारतीय बॉक्सिंग फेडरेशनला सांगितले की, 'मी या स्पर्धेतून माघार घेत आहे. कारण इतर तरूण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची अधिक संधी मिळावी. त्यांना महत्वाच्या स्पर्धेत खेळण्याचा अनुभव मिळावा. मी आता फक्त राष्ट्रकुल स्पर्धेत खेळण्यावर भर देणार आहे.'

Mary Kom withdraw from World Boxing Championships
शेन वॉर्नच्या व्हिलामध्ये थायलंड पोलिसांना आढळून आले रक्ताचे डाग

वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी बॉक्सिंग फेडरेशनची निवड चाचणी येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. 12 कॅटेगिरीमधील ही निवड चाचणी बुधवारपर्यंत चालले. यात आशियाई गेम्ससाठीच्या वजनीगटसाठी देखील निवड होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.