Premier League : चेल्सीचा दुबळ्या नॉर्विचवर 7-0 असा दणदणीत विजय

मेसन माऊंटने हॅट्ट्रीक मारून केले दमदार पुनरागमन
EPL
EPLSakal
Updated on

जयेश सावंत, (प्रतिनिधी) : स्टार खेळाडू मेसन माऊंटच्या (Mason Mount) हॅट्ट्रीकमुळे चेल्सीने (chelsea) शनिवारी इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये तळाशी असलेल्या नॉर्विच सिटीवर (Norwich CIty) 7-0 असा दणदणीत विजय मिळवीत प्रीमिअर लीगमधील (Englidh Premier League) आपले पहिले स्थान भक्कम केले. मेसन माऊंटने (Mason Mount) सामन्याच्या 8 व्या मिनिटाला गोल करीत चेल्सीचे (chelsea) खाते उघडले. यानंतर चेल्सीचा युवा खेळाडू कॅलम हडसन-ओडोईने (Cullum Hudson Odoi) 18 व्या मिनिटाला माटेओ कोवासिककडून (Mateo Kovacic) मिळालेल्या पासवर गोल करीत चेल्सीला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. चेल्सीच्या युवा गटातून नावारूपास आलेल्या डिफेंडर रीस जेम्सने (Reece James) 42 व्या मिनिटाला गोल मारीत चेल्सीला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळविण्यास मदत केली.

हाफ टाईमनंतर चेल्सीच्या खेळाडूंना चौथा गोल करण्यास फक्त 12 मिनिटे लागली. चेल्सीचा चौथा गोल डिफेंडर बेन चिलवेल(Ben Chilwell) याने मारला. या हंगामात एकही सामना जिंकण्यात अपयशी ठरलेले आणि फक्त दोन गोल करणारा नॉर्विच सिटीचा संघ चेल्सीच्या भेदक खेळामुळे गोंधळात पडला आणि 62 व्या मिनिटाला मॅक्स एरॉनने (Max Aarons) स्वतःच्याच गोलपोस्टमध्ये गोल मारून चेल्सीला 5-0 अशी आघाडी मिळवून देण्यास मदत केली. त्याहूनही धक्कादायक म्हणजे नॉर्विचच्याच बेन गिब्सनला (Ben Gibson) त्याच्या धोकादायक खेळामुळे रेफ्रीकडून रेड कार्ड दाखविण्यात आले.

EPL
Video : मार्करम झाला सुपरमॅन; हवेत उडी मारुन टिपला भन्नाट झेल

10 खेळाडूंसोबत खेळात असलेल्या नॉर्विचवर चेल्सीने कोणतीही दया-माया दाखविली नाही आणि गोल करण्याचा धडाका सुरूच ठेवला. 85 व्या मिनिटाला नॉर्विचचा गोलरक्षक टीम क्रुलने (Tim Krul) मेसन माऊंटची पेनल्टी वाचवली खरी, मात्र ती चुकीच्या पद्धतीने वाचविल्यामुळे पंचांनी त्याला पुन्हा एकदा पेनल्टी घेण्यास सांगितले. यावेळी मात्र माऊंटने कोणतीही चूक केली नाही. आणि गोल करीत स्कोर 6-0 असा केला. सामान्य संपण्यास काही अवधी शिलक्क असताना 91 व्या मिनिटाला माऊंटने आणखी एक गोल मारत चेल्सीचा 7-0 असा विजय आणि त्याच्या कारकिर्दीतील पहिलीवहिली हॅट्रिक पूर्ण केली.

EPL
पाक विरुद्धच्या लढतीपूर्वी विराट भडकला! नेमकं काय घडलं....

9 सामन्यांतील 7 विजयासह चेल्सी इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये 22 गुणांसह सध्या पहिल्या स्थानावर असून नॉर्विच 7 पराभवांसह शेवटच्या स्थानावर आहे. चेल्सीचा पुढचा प्रीमियर लीग सामना 30 ऑक्टोबरला न्यूकॅसल युनाइटेडसोबत (Newcastle United) होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.