Sports Year Ender 2022 : आंदोलनांनी गाजवलं खेळाचं मैदान

Sports Year Ender 2022 Protest In Global Sports Event
Sports Year Ender 2022 Protest In Global Sports Event esakal
Updated on

Sports Year Ender 2022 Protest In Global Sports Event : खेळाचं मैदान म्हटलं की, उर्जा असते, निखळ आनंद असतो. जिंकण्याची इर्ष्या असते. मात्र 2022 मध्ये खेळाच्या मैदानावर या सगळ्या भावभावनांबरोबर सामाजिक प्रश्न, अन्याय, हिंसाचार यांच्याविरुद्ध आवाजही उठवला गेला.

2022 मध्ये सगळं जग कोरोनातून सावरत होते. खेळांचे अनेक सामने कोरोनामुळे खोळंबले होते. त्यामुळे अनेक क्रीडा स्पर्धांसाठी हे वर्ष पुन:श्च हरिओम करण्याचं होतं. यंदा जवळपास प्रत्येक क्रीडा प्रकारातील मोठी स्पर्धा यंदा खेळली गेली. मग ते राष्ट्रकुल स्पर्धा असेल, विम्बल्डन असेल नाहीतर फिफा.

यंदाचं महत्त्व म्हणजे जगभरात घडलेल्या विविध घटनांचे आणि आंदोलनाचे पडसाद खेळाच्या मैदानावर उमटले.

Sports Year Ender 2022 Protest In Global Sports Event
FIFA WC22 : कतारमध्ये उडाली खळबळ! 48 तासांत आणखी एका पत्रकाराचा मृत्यू

ब्लॅक लाईव्ह मॅटर

अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीची पोलिसांनी गुडघ्याने गळा आवळून निर्दयी हत्या केल्यानंतर जगभरात त्याचे पडसाद उमटले होते. अमेरिकेत अजूनही कृष्णवर्णीय लोकांबाबत कशा प्रकारे वर्णभेद केला जातो याचे हे प्रतिक होते. जरी ही घटना २०२० मध्ये घडली असली तरी याबाबतची आंदोलने आजपर्यंत सुरू आहेत. जागतिक स्तरावरील अनेक खेळाडूंनी देखील याबाबत निषेध नोंदवला.

खेळाच्या मैदानात एका गुडघ्यावर बसून मूठ आवळलेला हात वर करत या अत्याचाराविरूद्ध निषेध नोंदवला जाऊ लागला. या आंदोलनाची तीव्रता इतकी होती की आजही अनेक स्पर्धांमध्ये सामना सुरू होण्यापूर्वी वर्णभेदाच्या निषेधार्थ आपल्या भावना आणि निषेध नोंदवला जात आहे. नुकतेच फिफा वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने इराणविरूद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी आपले गुडघे अशाप्रकारे मैदानावर टेकवत वर्णभेदाविरूद्ध आपला निषेध नोंदवला.

Sports Year Ender 2022 Protest In Global Sports Event
Year Ender: २०२२ मध्ये या कलाकारांनी थाटला संसार

ग्लोबल वॉर्मिंगच्या झळा

एका बाजूला खेळाडू वर्णद्वेषाविरूद्धचा निषेध नोंदवत होते. तर दुसऱ्या बाजूला जागतिक तापमान वाढीबाबत जगाचे लक्ष वेधण्यासाठी पर्यावरण कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या क्रीडा स्पर्धांचा वापर करण्यास सुरुवात केली.

- सप्टेंबर महिन्यात लेव्हर कप टेनिस स्पर्धेत एक कार्यकर्ता कोर्टवरच आग लावून ठिय्या मांडून बसला होता. आग लावताना त्याच्या हातापर्यंत या आगीच्या ज्वाळा पोहचल्या. मात्र तरीही त्याने निषेध नोंदवला. अखेर सुरक्षा रक्षकांनी त्याला उचलून बाहेर नेले.

- फ्रेंच ओपनच्या सेमी फायनलमध्ये देखील एका पर्यावरण बचाव मोहिमेतील कार्यकर्त्याने स्वतःला कोर्टवरील नेटला बांधून घेतले होते. त्याच्या टी शर्टवर आपल्याकडे 1028 दिवसच राहिले आहेत, असे लिहीले होते.

- तापमान वाढ आणि वातावरण बदलाकडे लक्ष वेधण्यासाठी क्रीडा स्पर्धांमध्ये निषेध आंदोलने करण्याचे हे लोन टूर दे फ्रान्समध्येही पोहचले. यावेळी या कार्यकर्त्यांनी रस्ता अडवून स्पर्धेतील सायकल स्वारांची चांगलीच अडचण केली होती.

- अशाच प्रकारे पेट्रोलियम पदार्थांचा इंधन म्हणून वापर करणं बंद करा हे सांगण्यासाठी काही कार्यकर्ते ब्रिटीश ग्रँड प्रिक्सच्या ट्रॅकवरच उतरले. यामुळे कार्यकर्त्याचा आणि स्पर्धेतील चालकांचा देखील जीव धोक्यात आला होता. अखेर त्याला सुरक्षा रक्षकांनी उचलून बाजूला नेले. या आंदोलनकर्त्यांची मागणी होती की ब्रिटनमधील नवे ऑईल आणि गॅस प्रोजेक्ट बंद करा.

- अशाच प्रकारे प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत देखील एका कार्यकर्त्याने स्वतःचा गळा गोलपोस्टला बांधून घेत अनोखे आंदोलन केले होते.

Sports Year Ender 2022 Protest In Global Sports Event
Virat Kohli : कोणतीही ट्रॉफी तुझे फुटबॉलमधील योगदान... कोहलीने रोनाल्डोसाठी लिहिली भावनिक पोस्ट

विम्बल्डनच्या इतिहासालाही आव्हान

विम्बल्डन म्हटलं हिरवं गवत आणि देखणा खेळ करणारे शुभ्रधवल वस्त्रांतील खेळाडू असं चित्र डोळ्यासमोर आहेत. मात्र विम्बल्डनचा हा पांढऱ्या कपड्यांचा कायदा महिला खेळाडूंना मात्र जाचक होता. याच कायद्याविरूद्ध महिला खेळाडूंनी 2022 च्या हंगामात आवाज उठवला. मासिक पाळीच्या वेळी महिला खेळाडूंना पांढऱ्या रंगाची अंतर्वस्त्रे घालणे, अत्यंत अवघड जाते. त्यामुळे आयोजकांनी पांढऱ्या कपड्यांची सक्ती रद्द करावी, अशी मागणी महिला खेळाडूंनी केली आहे.

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यावेळी आंदोलक महिला पांढरा स्कर्ट आणि लाल रंगाचे अंतर्वस्त्र घालून विम्बल्डनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हातात फलक धरून उभ्या राहिल्या होत्या.

Sports Year Ender 2022 Protest In Global Sports Event
Virat Kohli : विराट कोहलीने 200 शतकं ठोकली तरी... पाकिस्तानचा माजी खेळाडू वक्तव्य करून आला चर्चेत

परंपरावादी कतारमध्ये नव्या युगाचे वारे

- फिफा वर्ल्डकप 2022 हा कतारमध्ये होत आहे. कतार हा प्रतिगामी विचारसरणीचा देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे फुटबॉलच्या मैदानावर पाश्चिमात्य देश आणि कतार असा उभा संघर्ष पहावयास मिळाला. कतारने सुरूवातीला आपल्या प्रतिगामी नियमांमध्ये शिथीलता दिली. मात्र स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आधी दोन दिवस नियम कडक करत सर्वांचीच गोची केली.

- कतारमधील फिफा वर्ल्डकपमध्ये फुटबॉलचा थरार कमी आणि आंदोलन आणि निषेध प्रदर्शनांचीच रलचेल जास्त दिसली. यात प्रामुख्याने मानवी हक्कांचा मुद्दा समोर आला. सात युरोपियन देशांनी समलैंगिकतेला पाठिंबा देण्यासाठी रेनबो आर्म बँड घालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र फिफाने त्यांच्यावर कारवाई करण्याची धमकी दिल्यानंतर त्यांनी माघार घेतली.

- मात्र विषय इथं संपला नाही. जर्मनीने जपान विरूद्धच्या सामन्यावेळी संघिक फोटो काढताना तोंडावर हात ठेवून व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणल्याबद्दल फिफाविरूद्धच निषेध नोंदवला. यावेळी जर्मनी संघाने मानवाधिकाराबाबत तडजोड नाही असा कडक संदेश दिला.

- दुसरीकडे इराणने देखील आपल्या देशात स्त्रियांच्या हक्कांची गळचेपी होत असल्याची सत्यता फुटबॉलच्या मैदानातून जगासमोर मांडली. यावेळी हिजाब सक्तीविरूद्ध खुद्द इराणच्या संघातील खेळाडूंनीच आपल्याच देशाच्या राष्ट्रगीतावेळी शांतता राखत निषेध नोंदवला. इराणच्या अनेक नागरिकांनी देशात स्त्रियांच्या हक्कांविषयी सुरू असलेल्या आंदोलनाला कतारमधील फुटबॉल मैदानावरून समर्थन दर्शवले. कतारमधील सुरक्षारक्षकांनी त्यांचा आवाजही दाबण्याचा प्रयत्न केला.

वेल्सने LGBTQ चा झेंडा कतारमध्ये फडकवला. तसेच काही चाहत्यांनीसुद्धा हा झेंडा घेऊन मैदानात धाव घेतली. आणि आपला मुद्दा मांडला.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.