Sachin Tendulkar Birthday: सचिन तेंडुलकर लता मंगेशकरांना 'या' नावाने हाक मारायचा

लतादीदींचा लाडका सचिन त्यांना एका खास नावाने हाक मारायचा
sachin tendulkar, sachin tendulkar birthday, lata mangeshkar, sachin tendulkar and lata mangeshkar
sachin tendulkar, sachin tendulkar birthday, lata mangeshkar, sachin tendulkar and lata mangeshkarSAKAL
Updated on

Sachin Tendulkar and Lata Mangeshkar News: आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस. सचिन तेंडुलकरचं नाव उच्चारताच आठवतं ते त्याने केलेले विक्रम. सचिन तेंडुलकरने एका संपूर्ण पिढीला त्याच्या क्रिकेटने वेड लावलं.

आज सचिन रिटायर झाला तरीही जगभरातील तमाम क्रिकेटवेड्या फॅन्सच्या मनात सचिनचं एक आदराचं स्थान आहे.

सचिन आणि दिवंगत गायिका लता मंगेशकर यांचं खूप जवळचं नातं आहे. अगदी लतादीदींचा लाडका सचिन त्यांना एका खास नावाने हाक मारायचा. जाणून घेऊया.

(Sachin Tendulkar used to call Lata Mangeshkar by this name)

sachin tendulkar, sachin tendulkar birthday, lata mangeshkar, sachin tendulkar and lata mangeshkar
Namrata Sambherao अमेरिकेतल्या रस्त्यांवर बिनधास्त फिरतेय पावली अवली कोहली

लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.. "सचिन मला त्याच्या आईप्रमाणे वागवतो आणि मी नेहमी त्याच्यासाठी आईप्रमाणे प्रार्थना करते. तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही जेव्हा त्याने मला पहिल्यांदा 'आई' म्हटले होते.

मी याची कल्पनाही केली नव्हती. हे एक सुखद आश्चर्य होते. त्याच्यासारखा मुलगा मिळाल्याने धन्य वाटते,” असा खुलासा लता मंगेशकर यांनी केला होता.

अशाप्रकारे सचिन लता मंगेशकरांना 'आई' म्हणायचा

sachin tendulkar, sachin tendulkar birthday, lata mangeshkar, sachin tendulkar and lata mangeshkar
Riteish Deshmukh: “आयुष्यातील सर्वात मोठी चूक” तब्बल १७ वर्षांनी रितेश देखमुखने केला मोठा खुलासा..

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भारतरत्न मिळावा अशी लता मंगेशकर यांची इच्छा होती. "माझ्यासाठी तोच खरा भारतरत्न आहे.

वर्षानुवर्षे त्याने देशासाठी जे काही केले आहे, ते फार कमी लोक करू शकतात. तो या सन्मानास पात्र आहे.

त्याने आपल्या सर्वांना अभिमान वाटला आहे," पुढे सचिनला २०१४ ला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पण त्याआधीच लता मंगेशकर यांनी सचिनबद्दल हे भाकीत केलं होतं.

सचिन तेंडुलकरचा 2017 मध्ये ‘सचिन: अ बिलियन ड्रीम्स’ हा बायोपिक रिलीज करण्याची तयारी करत असताना लतादीदींनी त्यांच्या लाडक्या लेकाला शुभेच्छा दिल्या.

आज लतादीदी आपल्यात नसल्या तरीही सचिन तेंडुलकर दीदींनी दिलेलं प्रेम, संस्कार, शिकवण आयुष्यभर जपून ठेवलं आहे.

सचिन सुद्धा त्याच्या लाडक्या आईला नक्कीच मिस करत असणार यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.