मॅक्स ठरला F1 चा नवा चॅम्पियन; हॅमिल्टनला पराभूत करुन दाखवलं

हॅमिल्टन आणि मॅक्स यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळाली.
max verstappen
max verstappen
Updated on

रेड बुल संघाच्या मॅक्स वेरटॅपेन याने F1 World Drivers Championship स्पर्धेत लुईस हॅमिल्टनला पराभूत करुन दाखवलं. रविवारी मॅक्स वेरटॅपेनच्या रुपात नवा फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियन मिळाला. दुबईत पार पडलेली वर्षांतील अखेरची शर्यत जिंकून मॅक्सनं पहिले वहिले F1 जेतेपद पटकावले. अंतिम टप्प्यात हॅमिल्टन आणि मॅक्स यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळाली. निर्णायक फेरीच्या सुरुवातीला दोघेही 369.5 समान गुणांवर होते. मॅक्स वेरटॅपेन याला पहिल्यांदा सुरुवात केल्याचा फायदा मिळाला आणि त्याने स्टार रेसर लुईस हॅमिल्टनला मागे टाकले. सातवेळचा चॅम्पियन हॅमिल्टनने ग्रिडवर दुसऱ्या स्थानावरुन शर्यतीला सुरुवात केली होती.

त्याने ब्रिटनच्या लुईसचे आठव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा नवा विक्रम प्रस्थापित करण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. नँदरलंड्सचा युवा फॉर्म्युला-1 (Formula -1) रेसर मॅक्स वेरटॅपेन (Max Verstappen) 2021 F-1 वर्ल्ड चॅम्पियन झालाय. (F1 World Champion) रेड बुल रेसिंग (Red Bull Racing) च्या 24 वर्षीय ड्रायव्हर मॅक्स वेरटॅपेन याने अबू धाबी ग्रांप्री (Abu Dhabi GP) या वर्षातील अखेरच्या स्पर्धेत 7 वेळच्या मर्सिडीजच्या दिग्गज रेसर लुईस हॅमिल्टन (Lewis Hamilton) ला पराभूत केले.

max verstappen
युवांच्या गर्दीत द्रविड 'दर्दी गब्बर'ला देणार शेवटची संधी

मॅक्स वेरटॅपेन याने हॅमिल्टनच्या सलग 6 वेळा जेतेपद मिळवण्याच्या विक्रमाला ब्रेक लावला. अबू धाबी ग्रांप्रीपूर्वी दोन्ही रेसर 369.5 गुणांसह बरोबरीवर होते. या शर्यतीतून विजेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. मॅक्स वेरटॅपेन याने थरारक शर्यतीत 25 गुण मिळवून जेतेपदावर नाव कोरले.

max verstappen
Video : माईंड इट्! व्यंकटेश अय्यरची सेंच्युरी; रजनी स्टाइल सेलिब्रेशन

मरिना ट्रॅकवर झालेल्या 58 लॅपच्या शर्यतीत हॅमिल्टन सुरुवातीपासून शेवटपर्यंत आघाडीवर होता. पण 54 व्या लॅपमध्ये झालेल्या घटनेनं तो बॅकफूटवर गेला. विलियम्स रेसिंग टीमचा ड्रायव्हर निकोलस लातिफीची कार क्रॅश झाली. या घटनेनंतर शर्यतीचा कल बदलला. सर्व ड्रायव्हर्संना गती कमी करावी लागली. यावेळी हॅमिल्टन पहिल्या मॅक्स वेरटॅपेन दुसऱ्या स्थानावर होता. अखेरच्या लॅपमध्ये सेफ्टी कार नियम हटवण्यात आला. याचा फायदा उठवत मॅक्सनं F1 शर्यत जिंकण्याची विक्रमी कामगिरी करणाऱ्या हॅमिल्टनला ओव्हरटेक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.