मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत ( IND vs NZ 2nd test ) भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal ) आणि शुभमन गिलने दमदार फलंदाजी करत ८० धावांची सलामी दिली. मात्र शुभमन गिल ४४ धावांवर बाद झाल्यानंतर भारताचा डाव घसरला. विश्रांतीनंतर परतलेल्या कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli ) आणि चेतेश्वर पुजाराला ( Cheteshwar Pujara ) साधा भोपळाही फोडता आला नाही. मात्र त्यानंतर मयांक अग्रवालने डाव सावरत शतकी खेळी केली. त्याच्या नाबाद १२० धावांच्या खेळीमुळे भारताने दिवस अखेरपर्यंत ७० षटकात ४ बाद २२१ धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या बाजूने वृद्धीमान सहाने नाबाद २५ धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली.
वानखेडे वरील निर्णायक कसोटी सामन्यात पहिल्या दिवशीचे पहिले सत्र वाया गेले. अखेर सामना दुपारी १२ वाजता सुरु झाला. विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर मयांक अग्रवाल आणि शुभमन गिल या जोडीने चांगली सुरुवात करुन देत ८० धावांची सलामी दिली.
आक्रमक फलंदाजी करणारा शुभमन गिल आपल्या अर्धशतकाजवळही पोहचला होता. मात्र एजाज पटेलने ( Ajaz Patel ) भारताला पहिला धक्का देत गिलला ४४ धावांवर बाद केले. त्यानंतर आलेला चेतेश्वर पुजाराही आल्या पावली माघारी फिरला. त्यालाही एजाज पटेलनेच बाद केले. पाठोपाठ दोन विकेट पडल्यानंतर कर्णधार विराट कोहली खेळपट्टीवर आला.
मात्र विश्रातीनंतर परत आलेला कर्णधार विराट कोहली फक्त ४ चेंडूच टिकला. त्यालाही एजाज पटेलनेच आपली शिकार बनवली. पुजारा आणि विराट दोघेही शुन्यावर बाद झाल्यामुळे भारताची अवस्था बिनबाद ८० वरुन ३ बाद ८० अशी झाली. या पडझडीनंतर सलामीवीर मयांक अग्रवाल आणि कानपूर कसोटीतील हिरो श्रेयस अय्यर यांनी भारताचा डाव सारवण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी चहापानपर्यंत न्यूझीलंडला यश मिळू दिले नाही. दरम्यान, मयांक अग्रवालनेही अर्धशतकानंतर आपला गिअर बदलला होता.
चहापानानंतर पुन्हा खेळ सुरु झाल्यानंतर एजाज पटेलने पुन्हा एकदा भारताला हादरा दिला. त्याने श्रेयस अय्यरला ( Shreyas Iyer ) १८ धावांवर पॅव्हेलियनची वाट धरायला लावत आपला चौथा बळी टिपला. यानंतर वृद्धीमान सहा ( Wriddhiman Saha ) मयांकची साथ देण्यासाठी खेळपट्टीवर आला. मयांकनेही आपले चौथे कसोटी शतक पूर्ण करत भारतालाही दोन सत्रात द्विशतकी मजल मारून दिली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारताच्या ४ बाद २२१ धावा झाल्या होत्या.
मयांक अग्रवाल १२० धावा करुन नाबाद होता तर वृद्धीमान सहाने २५ धावांची नाबाद खेळी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.