१९ नोव्हेंबर... वर्ल्ड कप 2023 चा फायनल सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. ज्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला. आता 23 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे.
यादरम्यान देशांतर्गत सर्वाधिक लोकप्रिय असलेली विजय हजारे करंडक स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धा टीम इंडियाच्या बाहेर असलेल्या खेळाडूंच्या पुनरागमनासाठी आणि नवीन क्रिकेटपटूंना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी एक मोठे व्यासपीठ आहे. भारतीय संघाबाहेर असलेल्या मयंक अग्रवालने दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी जम्मू-काश्मीरविरुद्ध अशीच एक खेळी खेळून भारतीय निवड समितीचे लक्ष वेधले आहे.
अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमवर जम्मू-काश्मीरच्या घातक गोलंदाजीसमोर कर्नाटककडून खेळताना कर्णधार मयंक अग्रवालने 157 धावांची शानदार खेळी केली. या खेळीसाठी त्याने केवळ 133 चेंडू खेळले आणि 11 चौकारांसह 8 षटकार ठोकले. मयंकच्या या खेळीच्या जोरावर कर्नाटकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 2 गडी गमावून 402 धावा केल्या.
एक काळ असा होता जेव्हा मयंक अग्रवाल भारतीय कसोटी संघाचा नियमित भाग होता. आणि सलामीवीर म्हणून खेळत होता. पण फॉर्म खराब झाला आणि त्याला संघातील स्थान गमवावे लागले. त्याने मार्च 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. तेव्हापासून तो संघाबाहेर आहे आणि सातत्याने चांगली कामगिरी करूनही पुनरागमन करण्यात अपयशी ठरला आहे.
32 वर्षीय मयंक अग्रवालने 2018 मध्ये भारतासाठी पदार्पण केले. त्याने 21 कसोटी सामन्यांच्या 36 डावांमध्ये 4 शतके आणि 6 अर्धशतकांसह 1488 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 243 आहे. त्याला एकदिवसीय सामन्यांमध्ये केवळ 5 सामन्यांमध्ये संधी मिळाली ज्यामध्ये तो केवळ 86 धावा करू शकला.
जर आपण देशांतर्गत क्रिकेटबद्दल बोललो तर, त्याने 94 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 15 शतकांसह 7120 धावा, 104 लिस्ट ए सामन्यांमध्ये 13 शतकांसह 4637 धावा आणि 200 टी-20 सामन्यांमध्ये 2 शतकांसह 4674 धावा केल्या आहेत. अग्रवालने 123 आयपीएल सामन्यांमध्ये 1 शतक आणि 13 अर्धशतकांसह 2601 धावा केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.